Amitabh Bachchan Jalsa: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. त्याचा बांगला जलसाही खूप चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांचा जलसा हा मुंबईतील आलिशान घरांपैकी आहे. त्या बंगल्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नुकतच त्यांचं घर आतमधून कसं आहे, याविषयीची माहिती समोर आलेली आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.
अलीकडेच, संजय गुप्ता यांनी अमिताभ बच्चन यांना कांटे सिनेमाची स्क्रिप्ट सांगतानाचा काळ आठवला. कांटेसाठी अमिताभ ही त्यांची पहिली पसंती नसल्याचे त्यांनी सांगितले. तो चित्रपट नसीरुद्दीन शाह यांना घेऊन बनवायचा होता. पण जेव्हा त्यांनी संजय दत्तला स्क्रिप्ट सांगितली तेव्हा संजयला ती खूप आवडली आणि त्याने त्याला चित्रपटात काम करण्यास सांगितले. या भूमिकेसाठी संजय दत्तनेच अमिताभ बच्चन यांना सुचवले होते.
आतमधून कसा आहे अमिताभ यांचा जलसा?
संजय गुप्ता यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, 'संजय दत्तने अमितजींना फोन केला आणि विचारले की संजय गुप्ताला चित्रपटाचं नरेशन तुम्हाला करु देऊ का? त्यांनी दोन दिवसांनी सकाळी 11 वाजता घरी बोलावलं. मी खूप घाबरलो आणि 10.55 ला पोहोचलो. दोन गार्ड तिथे आले आणि मला गाडी पार्क करायला सांगितली. त्याने मला डिरेक्शनही दाखवली. मी कंपाऊंडमध्ये पोहोचलो आणि पायऱ्या चढून गेलो. मी अमिताभ बच्चन यांचे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे पाहिले होते. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच ते तुम्हाला आलिशान खोलीत घेऊन गेले. तिथे मला एका सोफ्यावर बसवलं आणि जेवण करायला सांगितलं.
पुढे त्यांनी म्हटलं की, 'यानंतर अचानक मागून एक दरवाजा उघडला आणि पांढऱ्या पठाणीत एक मोठी आकृती दिसली आणि ते मला दुसऱ्या खोलीत गेऊन गेले. 5 मिनिटात येतो म्हणाला. बिग बींना हाय-टेक साउंड सिस्टीम, स्पीकर आणि ग्रामोफोनमध्ये रस आहे हे मला माहीत होतं. त्यांच्या घरात 50-50 पेक्षा जास्त स्पीकर आहेत. त्यांच्या डेस्कवर एक मग होता, त्यामध्ये 25-30 डिझायनर पेन होते.