Amitabh Bachchan Shares Playful Moment with Sachin Tendulkar: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे केवळ एक उत्तम अभिनेता नाहीत तर, ते एक क्रिडाप्रेमी देखील आहेत. ते विशेषत: भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आहेत. त्यांनी अलिकडेच आयएसपीएल (इंडियन स्पोर्ट्स प्रीमिअर लीग) भाग घेतला होता. या ठिकाणी अमिताभ बच्चन क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकरसोबत दिसले होते. भेट झाल्यानंतर दोघांनी गप्पा मारल्या. तसेच दोघेही एकत्र 'फिंगर क्रिकेट' खेळताना दिसले. या दोन दिग्गजांना एकत्र खेळताना पाहून चाहते खूश झाले. दरम्यान, दोघांचा 'फिंगर क्रिकेट' खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या सीझनला 9 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. सचिन तेंडुलकर या लीगचा कोअर कमिटीचा सदस्य आहे. दरम्यान, 12 जानेवारीला अमिताभ बच्चन आणि सलमान खानच्या टिममध्ये टक्कर झाली. बिग बीच्या संघाला मैदानावर पराभव पत्करावा लागला. दिल्ली सुपरहिरोजने माझी मुंबई संघाचा 23 धावांनी पराभव केला. दरम्यान, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांनीही एकत्र 'फिंगर क्रिकेट' खेळण्याचा आनंद घेतला.
'फिंगर क्रिकेट' खेळतानाचा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियात शेअर केला. व्हिडिओ शेअर करत त्यांनी "क्रिकेटच्या देवासोबत फिंगर क्रिकेट खेळत आहे", असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडिओच्या शेवटी दोघांपैकी कुणीही जिंकत नाही. त्यांच्यामध्ये बरोबरी होते. दरम्यान, चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला. त्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. 'एका फ्रेममध्ये दोन महान कलाकार', अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली. या व्हिडिओतून दोघांमधील केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
बॉलिवूड कलाकारांच्या संघांचा समावेश
आयएसपीएल ही एक टी10 टेनिस बॉल क्रिकेट आहे. या क्रिकेट स्पर्धेला 2024 पासून सुरूवात झाली होती. दरम्यान, सलमान खान या लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच दिल्ली संघाचा मालक आहे. या क्रिकेट लीगमध्ये बॉलिवूडमधील अक्षय कुमार, करीना कपूर खान, सैफ अली खान, ह्रतिक रोशन, राम चरण आणि अजय देवगण या कलाकारांच्या संघाचा देखील सहभाग आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'सैराट'चा परशा राजकीय मैदानात उतरणार? आकाश ठोसर लातूरच्या काँग्रेस रॅलीमध्ये, PHOTO व्हायरल..