Amitabh Bachchan and Rekha kissing scene : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय होती. या दोघांनी एकत्र अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. ‘मिस्टर नटवरलाल’ पासून ते ‘दो अंजाने’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ आणि रेखा यांनी उत्कृष्टपणे काम केलंय. नंतरच्या काळात या जोडीच्या ऑफ-स्क्रीन रोमँसच्या चर्चा देखील पसरल्या होत्या. मात्र 1981 मधील रोमँटिक ड्रामा ‘सिलसिला’ हा खरा चित्रपट होता ज्याने प्रेक्षकांना पूर्णपणे भुरळ घातली. या चित्रपटात जया बच्चन यांचाही समावेश होता. ‘सिलसिला’नंतर मात्र अमिताभ आणि रेखा यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही. मात्र या सिनेमात अमिताभ बच्चन आणि रेखाचं एक रोमँटिक गाणं चर्चेचा विषय बनलं होतं. या गाण्यात रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा किसिंग सीन पाहायला मिळाला होता. 

'Silsila' नंतर रेखा आणि अमिताभ बच्चन एकत्रित काम केलं नाही

अमिताभ बच्चन आणि रेखाच्या या रोमँटिक गाण्याचं नाव आहे Yeh Kahaan Aa Gaye Hum....'Silsila' चित्रपटातील या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे सिलसिला या चित्रपटात अमिताभ बच्चन ,रेखा आणि जया बच्चन यांनी एकत्रित काम केलं होतं. या गाण्यात तब्बल 16 गाणी होती. त्यामुळे गाणी आणि सिनेमाची स्टोरी यामुळे हा सिनेमा बराच काळ चर्चेत होता. विशेष म्हणजे या सिनेमानंतर रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी कधीही एकत्रित काम केलं नाही. 

साल 1981 मध्ये प्रदर्शित झालेली ‘सिलसिला’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला, तरीही अनेक वर्षांनंतरही त्या चित्रपटाची चर्चा होते. दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या या चित्रपटाने एका उत्कृष्ट कथेसोबतच अनेक वादांनाही जन्म दिला. आपल्या करिअरमध्ये संकटाचा सामना करत असलेले अमिताभ बच्चन आणि यश चोप्रा — दोघांसाठीही ही फिल्म दुर्दैवी ठरली. ‘सिलसिला’ अपयशी ठरल्यानंतर अमिताभ बच्चन आणि यश चोप्रा यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला. 

या चित्रपटादरम्यान रेखा आणि जया बच्चन यांच्यातील मतभेदांची बातम्याही समोर आल्या. या चित्रपटाची कथा देखील अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्यातील लव्ह ट्रायअँगल इतकीच रोचक होती. मीडिया रिपोर्टनुसार, याच चित्रपटानंतर रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं अफेअर संपुष्टात आलं होतं. तसेच रेखा आणि जया बच्चन यांच्यातही या चित्रपटामुळे तणावाचं वातावरण तयार झालं होतं. शिवाय, जया बच्चन यांनी चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी थेट रेखा यांच्यावर टाकली होती, असंही बोललं जातं. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Shefali Jariwala Net Worth: शेफालीचा फक्त एकच हिट अल्बम, तरीसुद्धा कोट्यवधींचं नेटवर्थ; आता वारस कोण?

Sardaar Ji 3 Pakistan Box Office: भारतात विरोध, पण 'सरदार जी 3' पाकिस्तानात सुपरहिट; दिलजीत दोसांजची हैराण करणारी रिअ‍ॅक्शन, काय म्हणाला?