Amitabh Bachchan : कुली या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता पुनीत इस्सर यांच्यामध्ये फाईट सीन आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या फाईट सीनमध्ये अमिताभ बच्चन यांच्या पोटावर खरोखरचा जोरदार ठोसा बसला होता. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आणि आजही ते त्याचा त्रास भोगत आहेत. जसजसं महानायक अमिताभ बच्चन यांचं वय वाढत आहे, तसतसा हा जुना शारीरिक त्रास त्यांना अधिक त्रासदायक ठरत आहे. 'कौन बनेगा करोड़पति' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी स्वतः सांगितले की त्यांचा 25 टक्के लिव्हरचं कार्यरत आहे.
बिग बी 25 टक्के लिव्हरवर जिवंत
हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकासमोर बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले होते, "1982 मध्ये ‘कुली’च्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन करताना जखमी झाल्यानंतर मला खूप रक्ताची गरज होती. जवळपास 200 लोकांचे रक्त आणि सुमारे 7 बाटल्यांचं रक्त मला चढवण्यात आलं. त्या रक्तात एका व्यक्तीच्या रक्तामध्ये हिपॅटायटिस व्हायरस होता, पण तेव्हा ते सापडले नाही आणि तो माझ्या शरीरात आला. 2005 मध्ये जेव्हा जनरल इन्व्हेस्टिगेशन केलं, तेव्हा तो सापडला. पण तोपर्यंत माझ्या लिव्हरचं 75 टक्के नुकसान झालं होतं. आता माझा फक्त 25 टक्के लिव्हर कार्यरत आहे.. यामागचा मुद्दा एवढाच की, जर वेळेत तपासणी केली नाही, तर अशा रोगांचा धोका वाढतो."
‘कुली’ ठरली होती ब्लॉकबस्टर
'कुली' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. या चित्रपटाचे निर्माता केतन देसाई होते. मनमोहन देसाई आणि प्रयाग राज यांनी मिळून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचा बजेट अंदाजे 3.5 कोटी रुपये होता, तर याने बॉक्स ऑफिसवर 21 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह ऋषी कपूर, वहीदा रेहमान, अमरीश पुरी, कादर खान, पुनीत इस्सर, सुरेश ओबेरॉय, ओम शिवपुरी आणि प्रमुख अभिनेत्री म्हणून रति अग्निहोत्री यांचा समावेश होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या