Amitabh Bachchan Aamir Khan Cars Fined 38 Lakh: बॉलिवूड अभिनेते (Bollywood Actors) आणि त्यांच्या लग्झरी कार्सच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात. पण, याच लग्झरी कार्समुळे अमिताभ बच्चन आणि आमीर खानला मोठी डोकेदुखी सहन करावी लागत आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आमिर खान (Aamir Khan) यांच्या दोन लक्झरी गाड्यांमुळे बंगळुरूमध्ये (Banglore) टॅक्स वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या गाड्यांचा सध्याचा मालक बिझनेसमन 'केजीएफ बाबू'ला (Businessman KGF Babu) आरटीओनं (RTO) 38 लाखांचा दंड ठोठावला आहे. कर्नाटक रोड टॅक्स चुकवल्याबद्दल बंगळुरू आरटीओनं (Bangalore RTO) लग्झरी कार ब्रँडच्या दोन मॉडेल्सना 38 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वीत बिग बी अमिताभ बच्चन आणि आमीर खाननं आपापल्या लग्झरी कार्स इतरांना देऊन टाकलेल्या. तरीसुद्धा अजूनही या कार्स अमिताभ बच्चन आणि आमीर खानच्याच नावानं रजिस्टर आहेत. या कारचे खरे मालक बिझनेसमन आणि राजकारणी युसूफ शरीफ आहेत, ज्यांना 'केजीएफ बाबू' म्हणून ओळखलं जातं. 'केजीएफ बाबू' हे युसूफ शरीफ यांचं टोपणनाव कोलार गोल्ड फील्ड्समुळे त्यांना मिळालं आहे. शरीफ यांनी अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्याकडून काही वर्षांपूर्वी लक्झरी कार्स खरेदी केल्या होत्या, पण अजूनपर्यंत नोंदणीचं काम पूर्ण केलं नाही, ज्यामुळे त्या अजूनही बच्चन आणि खानच्या नावावर रजिस्टर आहेत.
कित्येक वर्षांपूर्वी विकूनही बिग बी आणि आमिरच्याच नावावर रजिस्टर आहेत कार्स
'मनीकंट्रोल डॉट कॉम'नं दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या गाड्यांपैकी एक लग्झरी कार 2021 मध्ये बंगळुरूमध्ये वापरली जात आहे. तर, आमिर खानची जुन्या लग्झरी मॉडेल्सपैकी एक कार 2023 पासून बंगळुरूतील रस्त्यांवर धावतेय.
कर्नाटकातील मोटर वाहन अधिनियमानुसार, राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या वाहनांना स्थानिक पातळीवर पुन्हा नोंदणी करावी लागेल आणि रस्ता कर भरावा लागेल. बिग बींच्या मॉडेलला 18.53 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, तर आमिर खानच्या मॉडेलला 19.73 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दोघांवरही कर्नाटकच्या वाहन नोंदणी आणि रस्ता कर नियमांचं दीर्घकाळ पालन न केल्याचा आरोप आहे.
वारंवार वॉर्निंग देऊनही दुर्लक्ष
विशेष म्हणजे, त्यापैकी एक गाडी 2021 मध्ये पहिल्यांदा आरटीओच्या रडारवर आली होती. पण, कर्नाटकात एक वर्ष पूर्ण झालं नसल्यानं ती त्यावेळी सोडून देण्यात आली होती. दरम्यान, दोन्ही वाहनांनी एक वर्षाची मर्यादा ओलांडली आहे, ज्यामुळे मोठा दंड आकारण्यात आला आहे. 2021 मध्ये, शरीफ यांनी 2021 च्या कर्नाटक एमएलसी निवडणुकीत 1,744 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. अशातच गाडी विकूनही एका प्रसिद्ध अब्जाधीश बिझनेसमनमुळे बॉलिवूडचे दोन सुपरस्टार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :