Kasturi Athlye Gets Engaged: मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Industry) 90 चे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल - आठल्ये (Kasturi Athlye) यांच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अलका कुबल यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुलगी, सून अशा विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. केवळ सिनेमा नाही तर, त्यांनी आपल्या कारकिर्दीत मालिकांमध्येही काम केलं. अलका कुबल (Alka Kubal) सध्या प्रोफेशनल नाही तर, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अलका कुबल - आठल्ये यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा (Engaged) पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने स्वत: आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर (Social Media) लेकीच्या साखरपुड्याचे फोटोस शेअर केले आहेत.
अलका कुबल यांच्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा पार (Alka Kubal Athlyes Younger Daughter Kasturi Athlye Gets Engaged)
अलका कुबल यांना दोन लेकी आहेत. दोन्ही लेकी या मनोरंजनविश्वापासून दूर आहेत. अलका कुबल यांनी मोठी लेकी ईशानीचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. 2022 साली तिचा लग्नसोहळा पार पडला. आता धाकट्या लेकीचाही साखरपुडा झाला. अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुकी आठल्ये आणि संकेत दुधाळ यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. अभिनेत्री सोशल मीडियात सक्रीय असते. अलका कुबल यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाडक्या लेकीच्या साखरपुड्याचे फोटोस शेअर केले आहेत. तसेच काही फॅमिली फोटोसही शेअर केले आहेत. अभिनेत्री कॅप्शनद्वारे लेक आणि जावयाला शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्या अलका कुबल यांच्या पोस्टची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.
अलका कुबल यांची लेक कस्तुरीने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. तसेच गळ्यात हार, नाकात नथ आणि कंबरपट्टा घालून आपला लूक पूर्ण केला होता. कस्तुरीने मिनिमल मेकअप लूक कॅरी केला होता. तसेच केस ओपन स्टाइल केले होते. या लूकमध्ये कस्तुरी खूप सुरेख दिसत होती. तर, अलका कुबल यांचे जावई यांनी ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता घातला होता. दोघांची जोडी सुंदर दिसत होती. अलका कुबल यांनी फोटो शेअर करत लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. 'तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. असेच कायम हसत एकत्र राहा. आनंदी राहा', असं अलका कुबल यांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. कस्तुरीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अलका कुबल यांच्या लेकीबद्दल बोलायचं झाल्यास, कस्तुरी आठल्ये हिने आपलं करिअर मनोरंजनविश्वात न करता वैद्यकीय क्षेत्रात केलं. आता कस्तुरी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
