Alia Bhatts New Year Family Photo: बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कामाबाबतीत असो किंवा वैयक्तिक आयुष्य, सोशल मीडियावर ती अप़डेट देत असते. आलिया भट्ट सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आलियाचं लग्न झाल्यापासून ती आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असते. पती रणबीर कपूर आणि मुलगी राहा कपूरसोबतचे फोटो आलिया शेअर करते. चाहते देखील कमेंट करून या गोड फॅमिलीचं कौतुक करतात. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त नुकतंच आलियाने एक पोस्ट शेअर केली आहे. या फो़टोमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि राहा कपूर दिसत आहे. आलिया आपला फॅमिली टाईम एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे. ही पोस्ट काही मिनिटांत सोशल मीडियात व्हायरल झाली. या पोस्टवर तिनं लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे.
राहाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर, तिचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अलिकडेच आलियाने ख्रिसमस साजरा करत असतानाचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. यात ती फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत असल्याचं दिसून येत आहे. आलियाने राहाला कायम मीडियापासून दूर ठेवलं. पण राहाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात.
आलियाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल
आलियाने 2026 या नववर्षाच्या स्वागतासाठी एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि मुलगी राहा कपूर दिसत आहे. या फोटोवर आलियाने कॅप्शन देखील दिलं आहे. '2026 या नवीन वर्षाची नवीन सुरूवात', असं तिनं फोटोला कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोवर अभिनेत्री करीना कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर यांनी कमेंट केले आहे.
लव्ह अँड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट्ससाठी काम करत आहेत. दोघांची जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. लव्ह अँड वॉर या चित्रपटात दोघेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमा अभिनेता विकी कौशल याची देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत.