Bollywood Actress Upcoming Movies This Year: 2026 आणि 2027 ही दोन वर्षे बॉक्स ऑफिससाठी (Box Office Collection) खास ठरणार आहेत. कारण बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्री मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉरर, अॅक्शन, ऐतिहासिक, चरित्रपट, लोककथांवर आधारित थ्रिलर आणि गँगस्टर ड्रामा अशा विविध धाटणीचे चित्रपट या काळात प्रदर्शित होणार आहेत. आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, तमन्ना भाटिया, कियारा अडवाणी आणि जान्हवी कपूर या पाच अभिनेत्रींच्या आगामी प्रोजेक्ट्सची सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे. मग तुमची उत्सुकता नेमकी कोणाच्या चित्रपटासाठी आहे?
आलिया भट्ट (Alia Bhatt)
आलिया भट्टकडे पुढील दोन वर्षांसाठी तगडी लाइनअप आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'Love & War' या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत झळकणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ती सोहम शाह आणि नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत 'तुंबाड 2' मध्ये दिसणार असून हा चित्रपट डिसेंबर 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय 'ब्रह्मास्त्र 2' देखील तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये आहे.
श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)
श्रद्धा कपूर 2026-27 मध्ये दोन वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'ईठा' या चरित्रात्मक चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट ऑगस्ट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'नागिन' हा अलौकिक कथानकावर आधारित चित्रपटही आहे. त्यामुळे गंभीर बायोपिकपासून ते सुपरनॅचरल मनोरंजनापर्यंत श्रद्धा वेगळ्या भूमिका साकारणार आहे.
तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia)
तमन्ना भाटियाकडे सर्वाधिक वैविध्यपूर्ण चित्रपट आहेत. ती 'रागिनी 3' या लोकप्रिय हॉरर फ्रँचायझीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'The Vvaan: Force Of The Forest' या लोककथांवर आधारित थ्रिलरमध्ये ती प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट सप्टेंबर 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी यांच्या 'Maria IPS' या अॅक्शन-ड्रामामध्ये ती जॉन अब्राहमसोबत झळकणार आहे. याशिवाय डिसेंबर 2026 मध्ये अजय देवगणसोबतच्या एका अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपटातही ती दिसणार आहे.
कियारा अडवाणी (Kiara Advani)
कियारा अडवाणी सुपरस्टार यशसोबत 'Toxic' या बहुचर्चित गँगस्टर ड्रामामध्ये दिसणार आहे. सुमारे 600 कोटी रुपयांच्या बजेटमुळे हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. ऑगस्ट 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
जान्हवी कपूर (Janhavi Kapoor)
जान्हवी कपूर 'देवरा पार्ट 2' मधून पुन्हा एकदा ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार आहे. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय 'लग जा गले' या अॅक्शनपटात ती टायगर श्रॉफ आणि लक्ष्यसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट मे 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
एकीकडे हॉरर, दुसरीकडे बायोपिक, तर कुठे गँगस्टर ड्रामा, लोककथांवर आधारित थ्रिलर आणि बिग बजेट अॅक्शनपट... 2026-27 मध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार हे निश्चित. आता पाहायचं एवढंच की, या पाच अभिनेत्रींपैकी तुम्ही सर्वाधिक कोणाच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहात?
