Alia Bhatt On India's Got Latent 2: समय रैनाच्या (Samay Raina) 'इंडियाज गॉट लेटेंट 2' (India's Got Latent 2) च्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट (Alia Bhatt) आणि शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आलेल्या. पहिला सीझन वादग्रस्त ठरल्यानंतर समय रैना दुसरा सीझन घेऊन आलाय, त्यात थेट आलिया भट्ट आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं. समयनंही आलिया, शर्वरीची खूप खिल्ली उडवली. तर, आलिया आणि शर्वरीनंही समय रैनाती बोलती बंद केली. आलियाला अलिकडेच 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये का आलीस? याबाबत विचारलेलं. पैसे हे तर कारण नव्हतं ना? असं विचारण्यात आलं. यावर आलियानं भन्नाट उत्तर दिलं.
आलियाला समयच्या शोमध्ये पैसे घेऊन गेलेली? (Alia Bhatt Go To Samay Show For Fee?)
आलिया आणि शर्वरी त्यांच्या 'अल्फा' (Alpha) सिनेमाच्या प्रमोशनसाठी जयपूरमधील जेईसीआरसी (JECRC) विद्यापीठात गेल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान, एका विद्यार्थ्यानं तिला विचारलं की, तिनं समय रैनाच्या वादग्रस्त शोमध्ये हजेरी का लावली? तेव्हा प्रेक्षकांमधील कोणीतरी ओरडलं, 'पैसा!' त्यावर आलियानं लगेच उत्तर दिलं, "कोणी म्हटलं ते? अरे, कोणीतरी गरीब माणूस..."
आलिया भट्ट नेमकं काय म्हणाली? (Alia Bhatt On India's Got Latent 2)
आलियानं बोलताना 'इंडियाज गॉट लेटेंट 2'चा अनुभवही सांगितला. त्यावेळी आलिया म्हणाली की, "समय ज्या पद्धतीनं सर्वांना हसवतो ते आम्हाला आवडतं. आम्ही खूप मजा केली. तुम्ही जे पाहिलं तो एक तासाचा एपिसोड होता, जो एडिट केला होता... तिथे आम्ही खरंतर चार ते पाच तास होतो... आम्ही जितका वेळ तिथे होतो, तितका वेळ आम्ही हसतच होतो..."
समयचा मोठा चाहतावर्ग आहे. पहिल्या सीझनमध्ये यूट्यूबर रणबीर अलाहाबादिया (YouTuber Ranveer Allahbadia) या शोमध्ये आला होता. एका स्पर्धकाशी संवाद साधताना त्याने वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. समयचा हा शो बंद करण्यात आला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
