Laughter Chefs 3 Winner: टेलिव्हिजनची लोकप्रिय जोडी अली गोनी (Ali Goni) आणि जन्नत जुबैर (Jannat Zubair) यांनी 'लाफ्टर शेफ्स: अनलिमिटेड एंटरटेनमेंट' (Laughter Chefs – Unlimited Entertainment) या रिअ‍ॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनची (Seasons 3) ट्रॉफी जिंकली आहे. अनेक आठवडे सुरू असलेला हा शो, स्वयंपाक करता-करता अनेक आव्हानं, हलकी-फुलकी थट्टा मस्करी आणि सेलिब्रिटी जोड्यांमधील चुरशीची स्पर्धा खेळल्यानंतर (Laughter Chefs Seasons 3 Grand Finale)  ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचला. अखेर रविवारी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये अली गोनी आणि जन्नत जुबैर या जोडीनं बाजी मारली. कॉमेडियन भारती सिंह अँकरिंग करत असलेल्या या शोमध्ये कॉमेडी करता-करता नवनव्या रेसिपी बनवण्याचा टास्क असायचा. तर, त्यासाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध शेफ हरपाल सिंह सोखी परीक्षक म्हणून उपस्थित असायचे. संपूर्ण सीझनमध्ये स्पर्धकांनी वेगवेगळ्या रेसिपी, तर वेळेचं बंधन आणि त्यासोबतच वेगवेगळी आव्हानं पार करत आपलं टॅलेंट दाखवलं. तर, कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी यांच्या जोडीने शोमध्ये विनोदाची उत्तम मेजवानी देत ​​प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं.

Continues below advertisement

दमदार केमिस्ट्री आणि सोशल मीडियावर जल्लोष (Ali Goni Jannat Zubair Winner)

आपल्या विजयाचा क्षण साजरा करताना, जन्नत जुबैरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अली गोनी आणि शोमधील इतर स्पर्धकांसोबतचे अनेक फोटो शेअर केले. या फोटोंसोबतच तिनं हा अत्यंत भावूक आणि मनाला स्पर्श करणारं कॅप्शनही दिलंय. जन्नतनं लिहिलंय की, शो जिंकण्याचा हा अनुभव अली गोनीशिवाय इतर कोणासोबतही शेअर करण्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. या प्रवासामुळे तिला एक जिगरी मित्र मिळाला आणि त्यांनी मिळून ही ट्रॉफी जिंकली. त्यासोबतच जन्नतनं प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत. दरम्यान, संपूर्ण सीझनदरम्यान, ही जोडी एकमेकांना प्रेमाने 'बिट्टू' आणि 'बिट्टी' अशी हाक मारायची, त्यांची ही मैत्री आणि केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. 

Continues below advertisement

स्वयंपाकघरात अली आणि जन्नत यांची जबरदस्त जुगलबंदी

अली गोनी आणि जन्नत जुबैर यांच्यातील उत्तम ताळमेळ आणि सातत्य यामुळेच ते इतर जोड्यांपेक्षा वेगळे आणि सरस ठरले. स्वयंपाकघरात प्रत्येक नवी पाककृती शिकण्यासाठी जन्नतनं नेहमीच उत्साह दाखवला, तर अली गोनीनं आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अत्यंत कठीण पदार्थही सहजतेनं बनवून दाखवले. अनेक कठीण आव्हानं आणि अनपेक्षित वळणं येऊनही या जोडीनं कधीही हार मानली नाही आणि एका खंबीर टीमप्रमाणे प्रत्येक आव्हानावर यशस्वीपणे मात केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Indian Idol 16 Winner Odisha Jyotirmayee Nayak: 'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव