Akshaya Naik Share Screen With Emraan Hashmis: कलर्स मराठीवरच्या (Colours Marathi) 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) या मालिकेत लतिकाच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री म्हणजे, अक्षया नाईक (Actress Akshaya Naik). या मालिकेतील आपल्या भूमिकेनं अक्षयानं अवघ्या महाराष्ट्रातील लोकांची मनं जिंकली. याव्यतिरिक्त अक्षयानं अनेक मराठी, हिंदी टेलिव्हिजन सीरियल्समध्ये (Television Serials) काम केलंय. अशातच आता अक्षया नाईकची थेट बॉलिवूडमध्ये वर्णी लागली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अक्षया नाईक आता लवकरच एका मोठ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये अक्षया नाईक बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

Continues below advertisement

2025 वर्ष संपताना अक्षया नाईकनं प्रेक्षकांसोबत गूड न्यूज शेअर केली असून आता तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करून मराठी सोबतीनं हिंदी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. आता लवकरच अक्षया अजून एका बड्या बॉलिवूड प्रोजेक्टचा महत्वपूर्ण भाग होणार आहे.        

नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी 'तस्करी' वेब सीरिजमध्ये अक्षया नाईक अनेक बॉलिवूडमधल्या बड्या स्टार्ससोबत दिसणार आहे. नुकताच 'तस्करी'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि यात ती एका सीनमध्ये इम्रान हाश्मी सोबत दिसतेय. पहिली वहिली वेब सीरिज आणि त्यातसुद्धा इम्रान सारख्या कलाकारांसोबत काम करणं हा अक्षयासाठी जॅकपॉट आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Continues below advertisement

तस्करीमधल्या अनुभवाबद्दल बोलताना अक्षया नाईक म्हणाली की, "इम्रान हाश्मी सरांसारख्या बॉलिवूडच्या बड्या स्टारसोबत आपण काम करतोय ही भावना खूप खास होती. आमच्या दोघांचे अगदीच 2/3 सीन होते, पण ते करताना देखील थोड दडपण आलं आणि तेवढं छानसुद्धा वाटलं. पहिली वेब सीरिज आणि सहकलाकार म्हणून इम्रान हाश्मी सरंसोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे, असं मला वाटतंय..." 

दरम्यान, फॅशन असो वा अभिनय अक्षया नाईक कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. आता येणाऱ्या काळात ती अजून नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स आणि भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळतेय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'ही' मराठी अभिनेत्री झळकणार इम्रान हाश्मीसोबत, Netflix च्या नवीन सिरीजने चाहत्यांची उत्सुकता ताणली