Akshaya Gurav Husband Bhushan Wani Separated: सध्या सोशल मीडियावर (Social Media) योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि सौरभ चौघुले (Saorabh Choughule) या सेलिब्रिटी जोडप्याच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरू आहेत. लग्नाच्या वर्षभरातच दोघेही वेगळे झाल्याचं बोललं जात आहे. अशातच आता आणखी एका मराठी अभिनेत्रीचा संसार मोडल्याचं समोर येतंय. लग्नाच्या आठ वर्षांनी अभिनेत्री आपल्या नवऱ्यापासून वेगळी झाल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत, पण दुसरीकडे अनेक सेलिब्रिटींचा काडीमोड होतोय, या गोष्टीवर अनेकजण चिंता व्यक्त करत आहेत. 

Continues below advertisement

आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अक्षया गुरव (Akshaya Gurav) हिच्या संसारातही वादळ आल्याचं बोललं जात आहे. साधारणतः आठ वर्षांपूर्वी अक्षया गुरव आणि दिग्दर्शक भूषण वाणी (Bhushan Wani) यांनी लग्नगाठ बांधलेली. पण, गेल्या काही दिवसांपासून दोघेही वेगळं राहत असल्याची माहिती मिळतेय. 

8 वर्षांचा संसार विखुरला? चर्चांना उधाण (Akshaya Gurav Bhushan Wani Divorced)

अभिनेत्री अक्षया गुरव आणि दिग्दर्शक भूषण वाणी यांच्या नात्यात दुरावा आलाय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दोघेही वेगळे राहतात. तसेच सोशल मीडियावर त्यांनी एकमेकांना अनफॉलोदेखील केलंय. त्या दोघांच्या सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटोदेखील पाहायला मिळत नाहीत. याशिवाय लग्नाचे फोटोदेखील त्यांनी डिलीट केलेत. यावरून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातंय. पण, अजून अक्षया किंवा भूषण दोघांपैकी कुणीच यावर वक्तव्य केलंल नाही. 

Continues below advertisement

मराठमोळी अभिनेत्री अक्षया गुरवच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी 'स्कॅम 1993' फेम अभिनेता प्रतिक गांधीसोबत 'फुले' सिनेमात झळकलेली. 'फुले' सिनेमात अक्षयानं समाजसुधारक फातिमा शेख यांची भूमिका साकारलेली. 'राधा प्रेम रंगी रंगली' या लोकप्रिय मालिकेतून अक्षया घराघरात पोहोचली. याव्यतिरिक्त तिनं 'रानटी', 'श्यामची आई', 'लव्ह लग्न लोचा' यांसारख्या सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं. तसेच, लवकरच ती एका आगामी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Yogita Chavan Saurabh Choughule: एकमेकांना अनफॉलो केलं, लग्नाचे फोटोही डिलीट; लग्नाच्या वर्षभरातच योगिता चव्हाण, सौरभ चौघुलेचा घटस्फोट?