Akshay Kumar Starrer Bhoot Bangla Release Date Changed: अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच एका नव्या हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्सचा आगामी फिल्म 'भूत बंगला'  या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत  अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  या चित्रपटात अक्षय कुमारचा दमदार कॉमेडी अवतार पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. फिल्म मेकर्सने या चित्रपटाची अपडेट सोशल मीडियात शेअर केली असून, चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी उत्सुक आहेत.

Continues below advertisement

अक्षय कुमार अभिनीत भूत बंगला हा चित्रपट 15 मे 2026 रोजी रिलीज होणार होता. मात्र, त्यानंतर चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आले आहे. आता हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. फिल्म मेकर्सने या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट एक महिना आधीच रिलीज होणार असल्याकारणाने  चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. 

 

Continues below advertisement

फिल्म मेकर्सने या चित्रपटाच्या रिलीज डेट बदलण्याचा निर्णय पूर्णपणे रणवीतीपूर्वक घेतले असल्याचं मानले जात आहे.  अक्षय कुमारच्या वर्षभरातील थिएट्रिकल रिलीज लाइनअपचा विचार करून, तसेच प्रेक्षकांचे लक्ष एका चित्रपटावर केंद्रीत राहावे, याच कारणास्तव भूत बंगला चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे.   कमी बॉक्स स्पर्धा तसेच,  या काळात चित्रपट प्रदर्शित करून योग्य वेळ मिळावी, हाच मुख्य उद्देश मेकर्सचा आहे. 

अक्षय कुमार अभिनीत भूत बंगला चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.  हा चित्रपट दमदार कॉमेडी एंटरटेनर असून, या चित्रपटाला योग्य वेळ मिळावा, यासाठी मेकर्सनं प्रदर्शनाच्या तारखेबाबत मोठा निर्णय घेतला. प्रियदर्शन दिग्दर्शित भूत बंगला या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त वामिका गब्बी, परेश रावल, राजपाल यादव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अक्षय कुमार,  शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी सांभाळली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

शारीरिक संबंध ठेव, तरच.... फिल्ममेकर्सकडून भयंकर मागणी, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडली होती इंडस्ट्रीच, पण आता नव्या भूमिकेत झळकणार मोठ्या पडद्यावर