Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार शनिवारी (दि.27) 'केसरी चॅप्टर 2' या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी चित्रपटगृहात उपस्थित राहिला. यावेळी अभिनेता आर माधवन देखील त्याच्यासोबत होता. चित्रपट संपल्यानंतर तो थेट प्रेक्षकांशी बोलला. पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत अभिनेत्याने म्हटले की, या घटनेमुळे कोर्टरूम ड्रामामध्ये त्याच्या पात्राला जो राग आला होता तोच राग निर्माण झालाय.

Continues below advertisement

इन्स्टाग्रामवर अक्षय कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चित्रपट संपल्यानंतर अक्षय कुमार चाहत्यांशी संवाद साधलाय. यावेळी तो पहलगाम हल्ल्याबाबत बोललाय. अक्षयने माईक हातात घेतला आणि प्रेक्षकांना संबोधित करताना म्हणाला, 'दुर्दैवाने आजही आपल्या सर्वांच्या हृदयात तो राग पुन्हा निर्माण झाला आहे. मी कशाबद्दल बोलत आहे हे तुम्हा सर्वांना चांगलेच माहिती आहे.

अक्षय कुमार पुढे म्हणाला, 'आजही आपण त्या दहशतवाद्यांबद्दल तेच म्हणू इच्छितो. या चित्रपटात मी जे म्हटले होते, (आजही आपल्याला) तोच राग पुन्हा जाणवत आहे. मी कशाबद्दल बोलत आहे हे तुम्हा सर्वांना नीट माहिती आहे. आजही मला चित्रपटात मी जे काही शब्द म्हटले आहेत तेच दहशतवाद्यांना सांगायचे आहे.

अक्षयच्या संवादाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खरं तर, चित्रपटातील एका दृश्यादरम्यान अक्षयने जालियनवाला बाग हत्याकांडानंतर संबंधित हत्या करणाऱ्यांना शिवीगाळ केली होती आणि तोच संवाद आज प्रेक्षकांनी पाकिस्तानसाठी वापरला. याआधी अक्षय कुमारने एक्सवर राग व्यक्त केला होता आणि लिहिले होते की, 'पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून धक्का बसला.' अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणे हे अत्यंत वाईट आहे. मी त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो.

'केसरी चॅप्टर 2' हा चित्रपट रघु पलट आणि पुष्पा पलट यांच्या 'द केस दॅट शूक द एम्पायर' या पुस्तकावर आधारित आहे, जो सी. शंकरन नायर आणि 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडावर केंद्रित आहे. अक्षय या चित्रपटात वास्तविक जीवनातील व्यक्ती सी. शंकरन नायरची भूमिका साकारत आहे, जो जालियनवाला बाग हत्याकांडाचे सत्य उघड करण्यासाठी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणारा वकील आहे.

 

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Saraf : 'वख्ख्या, विख्खी, वुख्यू....', अशोक सराफ यांनी सांगितली डॉयलॉगची पडद्यामागची कहाणी