Samrat Prithviraj On OTT :
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार रिलीज
'सम्राट पृथ्वीराज' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक जात नसल्याने शो रद्द करण्यात आले होते. त्यामुळे आता अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चौथ्या आठवड्यानंतर ओटीटीवर रिलीज होत आहे. 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाआधी अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला होता. अक्षयचे बॅक टू बॅक चित्रपट फ्लॉप ठरल्यानं आता अनेक लोक त्याला ट्रोल करत आहेत.
'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाच्या माध्यमातून मानुषी छिल्लरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
कलाकारांचे मानधन
अभिनेता अक्षय कुमारनं सम्राट पृथ्वीराज चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपसाठी त्यानं 60 कोटींचे मानधन घेतलं आहे. मानुषीनं सम्राट पृथ्वीराज या चित्रपटामध्ये संयोगिता ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी मानुषीनं एक कोटी एवढे मानधन घेतलं आहे, अशी चर्चा आहे.
कमल हसन यांच्या विक्रम आणि मेजर या चित्रपटांसोबत या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते आता ओटीटीवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत.
संबंधित बातम्या:
- Siddhant Kapoor : शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्सचं सेवन केल्याचं निष्पन्न
- Happy Birthday Disha Patani : अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात दिशाला करायचं होतं काम; मॉडलिंगनं करिअरला सुरुवात
R Madhavan : आर माधवनच्या 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर झळकला टाइम्स स्क्वेअरवर; व्हिडीओ व्हायरल