एक्स्प्लोर

अक्षय कुमार वाहन अपघात प्रकरणात मोठी अपडेट; मर्सिडीज चालक ताब्यात, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Akshay Kumar Safe After Serious Road Accident Near Juhu: जुहू येथे अक्षय कुमारच्या एस्कॉर्ट वाहनाजवळ भीषण अपघात घडला. भरधाव मर्सिडीजने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने चालक गंभीर जखमी झाला.

Akshay Kumar Safe After Serious Road Accident Near Juhu: सिनेसृष्टीतून खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. शूटिंगवरून परतत असताना अभिनेता अक्षय कुमारच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. विमानतळावरून जुहू येथील घरी जात असताना आलिशान मर्सिडीजने रिक्षाला धडक दिली.  यात अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी असलेल्या वाहनाचेही नुकसान झाले.  या भीषण अपघातात रिक्षाचा चुराडा झाला. तर, चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.  या भीषण अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत ऑटो चालकाला तातडीने रूग्णालयात नेले. तसेच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली.  दरम्यान, या अपघाताच्या घटनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जुहू पोलिसांनी  मर्सिडीज कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  तसेच त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.

अपघात नेमका कसा घडला?

या भीषण अपघाताची घटना जुहू येथील थिंक जिमजवळ 20 जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय कुमार शूटिंगवरून जुहू येथील घरी जाण्यासाठी परतत होता.  अक्षय कुमार उपस्थित असलेल्या कारच्या मागे सुरक्षेसाठी एस्कॉर्ट SUV जात होती. SUVच्या मागे  बासित खान नावाचा तरूण ऑटो रिक्षा चालवत होता.  दरम्यान, ऑटो रिक्षाच्या मागून एक भरधाव मर्सिडिज येत होती. भरधाव मर्सिडिजने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. ऑटो रिक्षाचा पुढचा भाग थेट SUVच्या मागच्या साईडला जाऊन धडकली. या भीषण अपघातात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला. तर, SUVचा मागचा भाग उचलला गेला. 

या भीषण अपघातात रिक्षा चालक गंभीर  जखमी झाला.  प्रत्यक्षदर्शींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रिक्षा चालकाला बाहेर काढले.  अपघात घडल्यानंतर अक्षय कुमार देखील आपल्या वाहनातून बाहेर आला.  मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या टीमने त्याला सुरक्षितस्थळी नेले.  अपघाताची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपास सुरू केला.  मिळालेल्या माहितीनुसार, श्री श्री रविशंकर महाराज यांच्या वाहनामुळे अपघात घडला असल्याची माहिती आहे. 

गांधीग्राम रोडवरील रहेजा या इमारतीमध्ये श्री श्री रवीशंकर महाराज काल रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास आले होते. यावेळी त्यांचे वाहन आत जात असताना रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.  वाहतूक कोंडीतून मार्ग काढत असताना  श्री श्री रवीशंकर महाराज यांच्या मर्सिडिजने रिक्षाला जबर धडक दिली. यानंतर अक्षय कुमार याच्या एस्कॉर्ट कार आणि  रिक्षाचा अपघात झाला.  अक्षय कुमार सहकुटुंब कारमधून जात असल्याची माहिती आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी मर्सिडिस कार चालक राधेश्याम रायविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget