एक्स्प्लोर

टेलरचं काम करायचे, वयाच्या 52 व्या वर्षी सिनेक्षेत्रात पदार्पण, 225 सिनेमात काम; कराचीच्या तुरुंगात देशासाठी तुरुंगवासही भोगला

AK Hangal : दिवंगत अभिनेते ए.के. हंगल यांनी वयाच्या 52 वर्षी सिनेक्षेत्रात पदार्पण केलं होतं. शोले सिनेमामुळे ते देशात फेमस झाले होते. त्यांनी जवळपास 225 सिनेमांमध्ये काम केलंय.

AK Hangal : शोले सिनेमातील 'रहीम चाचा' असोत किंवा 'लगानमधील शंभू काका'  या पात्रांबद्दल बोललं की डोळ्यांसमोर एका वृद्ध व्यक्तीची प्रतिमा उभी राहते. ही भूमिका साकारली होती ज्येष्ठ अभिनेते अवतार किशन हंगल ऊर्फ ए. के. हंगल यांनी. त्यांच्या अभिनयात अशी ताकद होती प्रेक्षक त्यांचे चाहते व्हायचे. शोले चित्रपटातील रहीम चाचांचा “इतना सन्नाटा क्यों है भाई…” हा डायलॉग याचं उत्तम उदाहरण आहे. ए. के. हंगल यांनी 52 व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी मोठा भाऊ, वडील किंवा वृद्ध माणसाच्या भूमिका साकारल्या. पण जेव्हा जेव्हा ते रुपेरी पडद्यावर झळकले, तेव्हा आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं.

ए. के. हंगल यांची आत्मकथा 'लाईफ अँड टाइम्स ऑफ ए. के. हंगल' मध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकानुसार, ए. के. हंगल यांच्या वडिलांचे एक जवळचे मित्र होते, त्यांनी हंगल यांना टेलर बनण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील एका टेलरकडून हे काम शिकून घेतलं.

1 फेब्रुवारी 1914 रोजी सियालकोटमध्ये जन्मलेले अवतार किशन हंगल हे चित्रपटात येण्यापूर्वी एक स्वातंत्र्यसैनिक होते. सुरुवातीच्या काळात ते टेलर म्हणून काम करत होते. पण 1929 ते 1947 या दरम्यान त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. या कारणाने त्यांना कराचीच्या तुरुंगात तीन वर्षं कैद भोगावी लागली. सुटकेनंतर ते भारतात आले. 1949 ते 1965 या काळात त्यांनी भारतीय रंगमंचावर अनेक नाटकांमध्ये अभिनय केला. जेव्हा त्यांचे वय 52 वर्षे होते, तेव्हा 1966 मध्ये बासू भट्टाचार्य यांच्या 'तीसरी कसम' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

1970 ते 1990 हा कालखंड ए. के. हंगल यांच्या कारकिर्दीसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला. या काळात त्यांनी हीर रांझा, नमक हराम, शौकीन, शोले, आइना, अवतार, अर्जुन, आंधी, तपस्या, कोरा कागज आणि बावर्ची यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका केल्या. सांगितलं जातं की त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत सुमारे 16 चित्रपटांत काम केलं. इतकंच नव्हे, तर हंगल यांनी मुंबईत झालेल्या एका फॅशन शोमध्ये व्हीलचेअरवर रॅम्प वॉक देखील केला होता. 'पहेली' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, तर ते अखेरचं 'मधुबाला' या टीव्ही शोमध्ये दिसले होते.

ए. के. हंगल यांनी आपल्या चार दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत तब्बल 225 चित्रपटांमध्ये काम केलं. वय वाढत राहिलं तरी चित्रपटात काम करण्याचा त्यांचा उत्साह कायम राहिला. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2006 मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं. 26 ऑगस्ट 2012 रोजी ए. के. हंगल यांचं निधन झालं. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवालावर अंत्यसंस्कार, डॉक्टरांकडून शवविच्छेदन अहवाल सुरक्षित; मृत्यूचं कारणंही अस्पष्ट

Sitaare Zameen Par BO Day 9: Sitaare Zameen Par BO Day 9: 'सितारे जमीन पर'ची 100 कोटींच्या क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; अक्षय कुमार, सनी देओलच्या फिल्म्सनी गुडघे टेकले!

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 2 First Poster Released: 'देऊळ बंद 2'मध्ये स्वामींचा सर्वसामान्य महिलेच्या दुचाकीवरुन प्रवास; 'देऊळ बंद 2'च्या पहिल्या पोस्टरनं उत्सुकता वाढवली
'देऊळ बंद 2'मध्ये स्वामींचा सर्वसामान्य महिलेच्या दुचाकीवरुन प्रवास; 'देऊळ बंद 2'च्या पहिल्या पोस्टरनं उत्सुकता वाढवली
Pooja Sawant On Women Safety: '...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज, ॲनिमल क्रुएल्टीबाबत म्हणाली...
'...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मुंबई हादरवणाऱ्या स्फोटांनंतरचं गूढ पुन्हा जिवंत; ‘मिशन मुंबई’तून उलगडणार थरार, कधी होणार रिलीज?
मुंबई हादरवणाऱ्या स्फोटांनंतरचं गूढ पुन्हा जिवंत; ‘मिशन मुंबई’तून उलगडणार थरार, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget