Ajit Pawar plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळातसह सर्वांच्याच मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित दादांना आज बारामती मधील विद्या प्रतिष्ठान मध्ये हजारोंच्या साक्षीनं अखेरचा निरोप देण्यात आला. काल (28 जानेवारी ) बारामती विमानतळा जवळ धावपट्टीवरून अवघ्या शंभर मीटर अंतरावर विमान कोसळून अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सर्व स्तरातून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला जात असताना महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात तीन दिवस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्यातील सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना तसेच मल्टिप्लेक्स चालक व व्यवस्थापकांना करण्यात आली आहे.
अजितदादांच्या अचानक जाण्याने राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रा ला धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजित दादा यांचे दुःखद निधन हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अपूरणीय क्षती असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
चित्रपटगृहांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात यावी
अजित पवारांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात तीन दिवस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती .राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यातील सर्व थिएटर मालक, मल्टिप्लेक्स चालक व व्यवस्थापन यांना राष्ट्रवादीने ही विनंती केलीये. चित्रपटगृहांमध्ये शोपूर्वी किंवा शोदरम्यान दोन मिनिटांचे मौन, श्रद्धांजली स्लाइड, व्हिडिओ प्रदर्शन अथवा अन्य सन्मानपूर्वक उपाययोजना करण्यात याव्यात, असं सांगण्यात आलं आहे . दरम्यान अनेक कलाकार व सेलिब्रेटींनी अजितदादांविषयी आपल्या भावना शेअर करत दुखायला वाट मोकळी करून दिली आहे .
अजितदादांसाठी हेमांगी कवीची भावनिक पोस्ट
मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट शेअर केली आहे. तिने अजित पवार यांच्यासोबत च्या एका आठवणीला उजाळा दिलाय. तिची पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
