Aishwarya Rai Cannes Film Festival: ऐश्वर्या राय जवळपास 20 वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिवलशी जोडलेली आहे. पहिल्यांदा ती 'देवदास' या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी तिथे गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत शाहरुख खानही दिसला होता. शिवाय ऐश्वर्या बऱ्याच काळापासून कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये लॉरियल पॅरिसची जागतिक राजदूत म्हणून जाते. पण नुकत्याच झालेल्या कान्स 2026 मध्ये लॉरियल पॅरिस या ब्रँडने कान्सच्या 'ले मार्टिनेझ' हॉटेलमध्ये आपल्या सर्व ब्रँड अँबेसिटरला भव्य बॅनरवर दाखवले. या भव्य हॉटेलवर लागलेल्या बॅनर्समध्ये ऐश्वर्या रॉय बच्चन कुठेही दिसली नाही. हे पाहून तिच्या चाहत्यांची मोठी नाराजी या ब्रँडला पत्करावी लागली आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या न दिसल्याने अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. शेवटी या ब्रँडला लोकांना उत्तर द्यावं लागलं.
ऐश्वर्या रायला वगळले; नाराज चाहत्यांना
'ले मार्टिनाझ' या पॅरिसमधील भव्य हॉटेलवर लागलेल्या बॅनर्सवर लोरियल पॅरिस या ब्युटी ब्रँडच्या सहा ॲम्बेसिडरचे फोटो लावण्यात आले होते. विशेषतः यात आलिया भट्टचाही समावेश होता. 2026 चा कान्स चित्रपट महोत्सवाच्या पोस्टरवर लोरियल पॅरिसने 6 प्रमुख राजदूतांची प्रतिमा लावली होती. आलिया भट्ट, व्हायोला डेव्हिस, इव्हा लोंगोरिया, हेलन मिरेन, जेन फोंडा आणि हेदी क्लम यांचा यात समावेश होता. आलिया भट्ट ला पाहून अनेकांना आनंद झाला पण चाहत्यांना ऐश्वर्या राय बच्चनची अनुपस्थिती खटकली. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या शिवाय मजा येणार नाही असं अनेकांनी म्हटलं. लॉरियल पॅरिस हा ब्रँड फक्त ऐश्वर्यामुळे लोकांना माहित आहे. पण तिचाच चेहरा पोस्टरवर का वगळला ? असा सवाल चाहत्यांनी केला. अनेकांनी ब्रँडला ट्रोल केलं. या वाढत्या ट्रोलिंग वर शेवटी ' लॉरियल पॅरिस ' ला नाराज चाहत्यांना त्यांना उत्तर द्यावं लागलं.
त्यांनी लिहिलं ' ती एक 'लिव्हिंग लेजंट ' आहे. तिला माहिती आहे या सगळ्याचं काय करायचं. वर्षानुवर्ष प्रत्येक कान्समध्ये तिने आपली छाप सोडली आहे. तिने कधीच निराश केलेले नाही ' असं लॉरियल पॅरिसने म्हटलं.
ऐश्वर्या राय गेल्या 24 वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिवलचा भाग आहे. 2002 मध्ये तिने पहिल्यांदा देवदास च्या प्रीमियर साठी हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत शाहरुख खान आणि फिल्म मेकर संजय लीला भन्साळीही होते. नंतर 2003 मध्ये ऐश्वर्या लॉरियल या ब्युटी ब्रांडच्या ग्लोबल ॲम्बेसिडर म्हणून दिसली. कान्स फिल्म फेस्टिवलच्या सर्वाधिक लोकप्रिय चेहऱ्यांपैकी असलेला हा भारतीय चेहरा आहे.
