Aishwarya Rai Bacchan Ponniyan Selvan Look: विश्वसुंदरी आणि जिनं आपल्या सौंदर्यानं फक्त बॉलिवूडसोबतच (Bollywood News) हॉलिवूडलाही (Hollywood) भूरळ घातली, अशी अभिनेत्री म्हणजे, ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bacchan). बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) हिंदी सिनेसृष्टीच्या (Hindi Film Industry) इतिहासातील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या सौंदर्यानं ऐश्वर्या आजही अनेकांना भूरळ घालते. ऐश्वर्या  अगदी तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. पण, ती जेवढी सुंदर आहे, तितकीच तिचा अभिनयही उत्तम आहे. ऐश्वर्यानं साधारणतः 1997 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केलाय. तिचं डेडिकेशन आणि प्रोफेशनलिज्ममुळे ती आजही बॉलिवूडमध्ये खंबीरपणे आपलं स्थान टिकवून आहे. 

ऐश्वर्याच्या कामबाबतीतल्या तिच्या सीरियसनेसची अनेक उदाहरणं आपण यापूर्वीही ऐकलीत. ऐश्वर्या एक परफेक्ट सीन देण्यासाठी जेवढी मेहनत घेते, तेवढी मेहनत कदाचितच इतर कुणी घेत असेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सिनेमातले सीन्स, डायलॉग्ज आणि एक्सप्रेशन्ससोबतच कॉस्ट्यूम परफेक्ट बनवण्यासाठीही ती खूप मेहनत घेते. याबाबतचा एक किस्सा समोर आला आहे.  नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना हैदराबादमधील एका ज्वेलर असलेल्या प्रतीक्षा प्रशांत यांनी ऐश्वर्या रायशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाला, "अरे ही तर बॉलिवूडची लेडी परफेक्शनिस्ट..."

 

कोणताही शॉर्ट देताना ऐश्वर्याला परफेक्शन हवंच असतं... (Pratiksha Prashant On Aishwarya Rai Bacchan)

ऐश्वर्या रायबाबत सांगताना प्रतीक्षा प्रशांत यांनी सांगितलं की, "ऐश्वर्या उगाच एवढी मोठी स्टार झालेली नाही... मी स्वतः पाहिलंय की, ती आपला लूक, ड्रेस, स्टाईल आणि कॉस्ट्यूमबाबत किती अलर्ट असते. तिला स्वतःच्या हेअरस्टाईलमध्ये एकही हेअर पिन दिसायला नको असतो... तिला प्रत्येक अँगलनं परफेक्ट दिसायचं असतं..."

ऐश्वर्यावर स्तुतिसुमनं उधळताना प्रतीक्षा प्रशांत यांनी एक किस्सा शेअर केला आहे. त्यांनी सांगितलं की, "पोन्नियन सेल्वन सिनेमाच्या एका सीनमध्ये तिला ऑर्गेंजा साडी नेसायला दिलेली. शुटिंगवेळी ती तब्बल 6-7 तासांपर्यंत सेटवर उभी राहिली आणि अजिबात चुकूनही बसली नाही, कारण तिची साडी तिला अजिबात चुरगळू द्यायची नव्हती, तिला साडीवर एक छोटीशी अढीही नको होती... हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय..." 

दरम्यान, पोन्नियिन सेल्वन मणि रत्नम यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा असून तो दोन पार्ट्समध्ये प्रदर्शित करण्यात आलेला. या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन हिनं नंदिनीची भूमिका साकारली होती. पोन्नियिन सेल्वन 2 मध्ये तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालेलं आणि तिला SIIMA अवॉर्ड्सनी सन्मानित करण्यात आलेलं. ऐश्वर्याला या सिनेमासाठी 'बेस्ट एक्ट्रेस इन लीडिंग रोल' (क्रिटिक्स) चा पुरस्कार मिळालेला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shraddha Kapoor Aunt Tejaswini Kolhapure: 39 वर्षांची श्रद्धा कपूर लग्नबंधनात अडकणार? बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, मावशीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण