South Superstar Facing Affair Rumors: अभिनय सोडून राजकारणात प्रवेश करणाऱ्या आणि पहिल्याच निवडणुकीत धुमाकूळ घालणाऱ्या थलपती विजय (Thalpathy Vijay) यांचं वैयक्तिक आयुष्य बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या पत्नीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून थलपती विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावलेत. अशातच, गेल्या काही दिवसांपासून थलपती विजय आणि तृषा कृष्णन (Trisha Krishnan) यांचं एकत्र दिसणं आणि तामिळनाडूचे (Tamil Nadu Politics) नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय (Chief Minister Thalapathy Vijay) यांच्या थपथविधी सोहळ्यात तृषा कृष्णन हिचं मिरवणं, यामुळे आता त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. अशातच आता थलपती विजय यांच्यापाठोपाठ आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्याच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. हा अभिनेता साधासुधा नाहीतर 1800 कोटींची ब्लॉकबस्टर फिल्म देणारा सुपरस्टार आहे. त्यामुळे आता याचर्चांनंतर या अभिनेत्याच्याही संसारात वादळ येणार का? या चर्चा रंगल्या आहेत. 

Continues below advertisement

सध्या सिनेसृष्टीतील सुपरस्टार्स चर्चेचा विषय बनले आहेत. एका बाजूला, थलपती विजय राजकारणात प्रवेश करून मुख्यमंत्री बनणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला, त्यांचे आणि अभिनेत्री तृषा कृष्णनच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आणखी एका दक्षिण भारतीय सुपरस्टारला अशाच प्रकारच्या अफवांचा सामना करावा लागत आहे. आम्ही ज्या साऊथ सुपरस्टारबाबत सांगतोय, तो दुसरा-तिसरा कुणी नसून अल्लू अर्जुन आहे. अल्लू अर्जुनचं नाव सध्या सुप्रसिद्ध अभिनेत्री 'सीरत कपूर' हिच्याशी जोडलं जातंय. 

Continues below advertisement

अल्लू अर्जुन आणि सीरत कपूर यांच्याबद्दलच्या चर्चांना उधाण 8 एप्रिल रोजी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे झाला. 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनचा 44 वा वाढदिवस होता. सीरत कपूर हिनं अल्लू अर्जुनच्या प्रायव्हेट जेटवर त्याच्यासोबत काढलेले फोटो शेअर केले. अल्लू अर्जुन आणि सीरत कपूर यांच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा वर्षाव झाला खरा, पण काहींनी कमेंट करत आक्षेपार्ह्य आणि असभ्य कमेंट्स केल्या. याच टिकांवर अभिनेत्रीनं सडेतोड उत्तर दिलं. 

अलिकडेच सीरतनं तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन स्वतःचा एक बोल्ड फोटो शेअर केलेला. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलेलं की, "माझ्या स्वतःच्या अंदाजात वीकेंडची सुरुवात..." या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका युजरनं लिहिलंय की, "अल्लू अर्जुन की प्रॉपर्टी..." आणि त्यासोबतच त्याने 'हार्ट' इमोजी देखील जोडलाय. या कमेंटवर सीरतनं सडेतोड प्रत्युतर देत ट्रोलरची बोलती बंद केली आहे. 

 

साधारणपणे, सेलिब्रिटी अशा कमेंट्सकडे दुर्लक्षच करतात. पण, सीरतनं या टिप्पणीला अत्यंत सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. तिनं लिहिलंय की, "केवळ एक इमोजी जोडल्यानं एखादी कमेंट आदरपूर्ण ठरत नाही, सर. कोणतीही स्त्री ही कोणाचीही मालमत्ता नसते. तिचं स्वतःचं असे एक वेगळं अस्तित्व असतं, तिची स्वतःची स्वप्न असतात आणि तिचा स्वतःचा असा एक आवाज असतो... तुम्ही नक्कीच कौतुक करा, पण तसं करताना मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नका... देव तुमचं भलं करो..."

अभिनेत्री सीरत कपूर कोण? (Actress Seerat Kapoor)

सीरत कपूर ही एक भारतीय अभिनेत्री, कोरियोग्राफर आणि मॉडेल आहे. तिनं 2014 मधील 'रन राजा रन' (Run Raja Run) या तेलुगू सिनेमाद्वारे आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ती जिद (Zid) या बॉलिवूड सिनेमात झळकली. सीरत 2023 मधील 'सेव्ह द टायगर्स' (Save the Tigers) या सीरिजमध्ये आणि 2024 मधील Bhamakalapam 2 या सिनेमात दिसून आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Trisha Krishnan Offer From Opposition Party: तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्विस्ट? थलपती विजय यांचे कट्टर विरोधक स्टॅलिन यांची तृषा कृष्णनला 12 कोटींची ऑफर