Salman Khan Brother In Law Receives Threat: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता रणवीर सिंहला (Ranveer Singh) व्हॉट्सअॅपवर वॉईस नोटद्वारे जीवेमारण्याची धमकी देण्यात आलेली. त्यापूर्वीच सलमान खानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबार अन् त्यानंतर निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Producer-Director Rohit Shetty) घरावरील गोळीबारानं अख्ख्या बॉलिवूडला हादरवून सोडलं. अशातच आता पुन्हा एकदा सलमान खानच्या घरी धमकीचा ई-मेल (Threatening Email) आला आहे. सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माला (Aayush Sharma) धमकीचा ई-मेल आला आहे. 

Continues below advertisement

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष शर्माला आलेला धमकीचा ई-मेल प्रोटोन मेलमार्फत पाठवण्यात आलेला. ईमेल पाठवणाऱ्यानं स्वतः लॉरेंस बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगितलं आणि आयुष शर्माला धमकी दिली. दरम्यान, धमकीच्या ई-मेलमध्ये कोणत्याही प्रकारच्या रकमेचा किंवा अटी-शर्थींचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मुंबई पोलिसांची क्राइम ब्रांच या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. ही घटना म्हणजे, बॉलिवूडमध्ये येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना तर नाही ना? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

सलमान खानच्या कुटुंबाला आणि जवळच्या सहकाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून यापूर्वी अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्स या घराबाहेर गोळीबार झालेला. ज्यामध्ये दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी चार राउंड गोळीबार केला होता. बिश्नोई टोळीनं त्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती आणि पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. अलिकडेच रणवीर सिंहला मंगळवारी कोट्यवधी रुपयांची मागणी करणारी एक व्हॉट्सअॅप व्हॉइस नोट मिळाली.

Continues below advertisement

रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवाय, जानेवारी 2025 मध्ये, चित्रपट निर्माते रोहित शेट्टीच्या घरी गोळीबार झाला होता, ज्यामध्ये पाच संशयितांना अटक करण्यात आली होती. पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणांमध्ये, धमकी देणाऱ्यानं प्रोटॉन मेल किंवा व्हीपीएन वापरणं यासारख्या त्यांची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. अर्जुन पाठक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुष शर्माचं लग्न सलमान खानची बहीण अर्पिता खानशी झालंय. तो सिनेमांमध्ये काम करतो आणि कुटुंबाच्या जवळ राहतो. पोलिसांनी ईमेलची चौकशी सुरू केली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ranveer Singh Receives Threat: सलमान, रोहीतनंतर, आता रणवीर सिंहला धमकी; कोट्यवधींची मागणी, घराबाहेर कडेकोट बंदोबस्त