Bhadipa Show: सध्या सर्वत्र चर्चेच असलेला रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्याच्या वादाचा फटका आता इतर शो' ला देखील बसत असल्याचं दिसून येत आहे. रणवीर अलाहाबादीयाच्या वक्तव्याचे पडसाद संसदेत देखील उमटल्याचं दिसून आलं. इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाडिपाच्या 'अतिशय निर्ल्लज कांदेपोहे'चा एपिसोड पुढे ढकलण्यात आला आहे. भाडीपाच्या या शो'ला आता मनसेने इशारा दिला आहे. अतिशय निर्ल्लज कांदेपोहेचा पहिला भाग भाग्यश्री लिमयेसह आणि टीमसोबत पार पडला होता. आता दुसऱ्या भागात मात्र सई ताम्हणकर बरोबर होणारा भाग भाडिपाने पुढे ढकलला आहे. तसंच या शोसाठी ज्यांनी तिकिटं बुक केली होती त्यांनाही पैसे परत दिले जाणार आहेत, अशी माहिती आहे. तर भाडिपा आणि  सारंग साठ्येला देखील पुणे मनसे चित्रपट सेनेने इशारा देत असे शो खपवून घेतले जाणार नाहीत, आणि केले तर ते बंद पाडू असा इशारा देण्यात आला आहे. 

Continues below advertisement


रणवीर अलाहाबादीयाच्या प्रकारानंतर सर्वत्र वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. आता सारंग साठ्येच्या अतिशय निर्लज्ज शो मनसेकडून बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मनसे चित्रपट सेनेच्या निशाण्यावर सारंग साठ्येचा अतिशय निर्लज्ज शो आला आहे. सारंग साठ्ये विरोधात मनसे चित्रपट सेना आक्रमक झाली आहे. मनसे स्टाईल पुण्यातील शो बंद पडणार असल्याचा मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रेनी सोशल मिडियावरती पोस्ट लिहून इशारा दिला आहे. त्याचबरोबर आपल्या फेसबुक पोस्टमधून मनसे चित्रपट सेनेने सारंग साठ्येला विरोध दर्शवला आहे. 


चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रे काय म्हणालेत?


रणवीर अलाहाबादिया यानी जे नुकतच वक्तव्य केलं त्यानंतर त्याचे क्लिप व्हायरल झाली. त्या घटनेने आपल्या सर्वांचीच मान शर्मिने खाली गेली आहे. पण हे प्रकरण इथेच थांबलेलं नाही. त्या शो सारखे शो बनवण्याचा काही मराठी कलाकार प्रयत्न करत आहेत. असा आम्हाला आढळलं आहे, मराठीचे धडे देणारे सो कॉल्ड चैनल भाडिपा. सारंग साठ्ये यांचे भाडिपानी अतिशय निर्लज्ज नावाचा एक शो त्याच धर्तीवर चालू केला होता. कालच त्यांनी त्याच्यावरचा व्हिडिओ डिलीट केलेला आहे. परंतु तो व्हिडिओ आमच्या हाती लागलेला आहे आणि आम्ही कायदेशीर रित्या त्यावरती कारवाई करता येईल का ते तपासत आहोत. त्यावर मनसे चित्रपट सेना लवकरच ॲक्शन घेईल, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही भाडिपा आणि सारंग साठ्ये त्याचबरोबर त्यांचे फॅन्स आणि त्या व्हिडिओ काढणारे आणखी काही चैनल आमच्या नजरेसमोर येत आहेत. त्या सर्वांना आम्ही आवाहन करू इच्छितो, जर तुम्ही अशा पद्धतीच्या कोणत्याही प्रकारचा शो पुणे शहरात आयोजित करायचा विचार करत असाल, तर आम्ही तो उधळून लावू. अशा पद्धतीचे मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीला धक्का पोहोचेल अशा कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम शहरात होऊ देणार नाही.


अशा बेभान कलाकारांना अशा थिल्लर चाळे करणाऱ्या कलाकारांना या पुणे शहरात आम्ही अजिबात उभा राहू देणार नाही. भाडीपाने चांगले-चांगले शो करावेत. लोकांचं मनोरंजन करावं. याबद्दल आमचं काही मत नाही. मात्र, स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी नेहमीच कुटुंब व्यवस्था, नीती मूल्य याचं नेहमीच अवलोकन केला आहे. इथपर्यंत ठीक होतं. पण, आता ते मर्यादा ओलांडत आहेत. मराठी अस्मितेला आणि मराठी संस्कृतीला धक्का पोहोचवत आहेत आणि हे मनसे मराठी चित्रपट सेना कदापि सहन करणार नाही. त्याचबरोबर मी मराठी माणसांना आवाहन करतो की, अशा पद्धतीच्या कलाकारांच्या शोला तुम्ही जाऊ नका. मनसे चित्रपट सेना हा शो बंद पाडेलच. मात्र, मराठी माणसाने देखील पेटू उठलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे शो आणि अशा पद्धतीचे यूट्यूब चैनल कसे बंद करता येतील यावरती काम केलं पाहिजे, असं देखील चेतन धोत्रे यांनी म्हटलं आहे.


फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय?


"रणवीर अलाहबादिया आणि सारंग साठे सारखेच !  रणवीर अलाहबादिया हा असं वक्तव्य करेल हे कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र त्याच्या वक्तव्याने अनेकांची मान शरमेने खाली गेली. तसेच काहीसे आपल्या मराठीतील कलाकारांचे मराठी संस्कृतीचे ऑनलाइन धडे देणारे ‘भाडिपा’ (YouTube Channel) यांचा देखील थिल्लर चाळे चालणारा ‘अतिशय निर्लज्ज’ नावाचा शो मराठी माणसाच्या विचारसरणीला आणि अस्मितेला न शोभणारा आहे. या चॅनेलकडून अनेकदा स्वतःचा TRP वाढवण्याकरिता आपली संस्कृतीमूल्य, कुटुंबसंस्था यांचं वेळोवेळी अवमूल्यन होतंच असतं , हे असे आगावूपणे बोलणे बास झालं आता. ही कीड आता सगळीकडे पसरत चालली आहे परंतु आता पुण्यात हे होऊन दिलं जाणार नाही. त्यांनी लोकांची चांगल्या पद्धतीने करमणूक करावी त्याला मनसे चित्रपट सेना नेहमी साथ देईल. परंतु या बाकीच्या भानगडीत पडू नये."