तिची पटकन पप्पी घेतली अन्... गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं जयश्री पाटलांना प्रपोज कसं केलं; वाचा टेलिफोन बुथवर नेमकं काय घडलं होतं?
गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी प्रेमविवाह केलेला आहे. व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने या जोडीने त्यांची फिल्मी स्टाईल प्रेमकहाणी सांगितली आहे.

Gunaratna Sadavarte And Jayashree Patil Love Story : वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील हे नेहमीच चर्चेत असतात. गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतेच बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर तर ते देशभरात चर्चेत आले होते. दरम्यान, याच जोडीने व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांची फिल्मी स्टाईल प्रेमकहाणी सांगितली. सोबतच गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या पत्नीला कसं प्रपोज केलं, याचीही गोष्ट सांगितली.
पाच वर्ष एकमेकांना डेट केलं
ठरवून केलेल्या गोष्टी टिकत नाहीत. आम्ही पाच ते सहा पाच वर्ष फिरायला गेलो. आम्ही अनेक ठिकाणी सोबत प्रवास केला. अनेक शहरांत काही कारणांनिमित्त गेलो. मुलाने मुलीला पाहिले. नजरेला नजर भिडली मुलगी पटली असं काही झालेलं नाही. तर लग्न ठरायच्या अगोदर पाच वर्ष आम्ही वेगवेगळ्या विषयावर सोबत काम केलं, अशी माहिती सदावर्ते यांनी दिली.
मॅच्यूरिटी आल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला
जयश्री माध्यमांत काम करत होती. कायद्याचे शिक्षण घेत घेत ती माध्यमांत काम करत होती. मिही दंतवैद्यकशास्त्राचे शिक्षण घेऊन कायद्याचे शिक्षण घ्यायला गेलो होतो. मॅच्युरिटी आल्यानंतर मी लग्न करायचे ठरवले, असंही सदावर्ते यांनी सांगितलं.
डेटवर जाणं अपराध नाही, डेटवर गेलंच पाहिजे
लग्न करत असताना दोन ते तीन गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतल्या पाहिजे. डेटवर जाणं हा अपराध नाही. लग्नाच्या अगोदर डेटवर गेलंच पाहिजे. असं माझं मत तयार झालं आहे. संस्कृतीच्या ठेकेदारांनी काहीही म्हणून देत पण डेटवर गेलंच पाहिजे. दोघांनाही तशी मुभा असली पाहिजे. आम्हीही खूप फिरलो. आम्ही डेटवर गेलो, असंही तुम्ही म्हणू शकता, असे सदावेर्ते म्हणाले.
गुणरत्न सदावर्तेंनी जयश्री पाटलांना प्रपोज कसं केलं?
मी जयश्रीला अनोख्या पद्धतीने प्रपोज केलं होतं. आमच्या काळात मोठे टेलीफोन बुथ असायचे. त्या टेलीफोन बुथमध्ये एक छोटीशी जागा असायची. त्याच जागेवर मी तिची पटकन पप्पी घेतली होती आणि तिला आय लव्ह यू म्हणालो होतो, अशी आठवण गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितली. विशेष म्हणजे त्या वेळी माझ्या अंगावर काटा आला होता, असेही पुढे जयश्री पाटील यांनी सांगितले.
गुणरत्न सदावर्तेंनी जयश्री पाटलांना पुन्हा एकदा केलं प्रपोज
हा प्रसंग सांगितल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी गुडघ्यावर बसून जयश्री पाटलांना लाल गुलाब दिला. तसेच तीन वेळा आय लव्ह यू म्हटलं.
हेही वाचा :
काय सांगता? उर्फी जावेदचा साखरपुडा झाला? व्हायरल फोटोंमुळे चर्चेला उधाण, जाणून घ्य नेमकं सत्य काय?























