Adnan Sami Come Back On Instagram: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामीनं (Adnan Sami) काही दिनसांपूर्वी त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. त्यावेळी त्यानं ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला होता. सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केल्यामुळे अदनान सामी हा चर्चेत होता. या पोस्ट त्यानं का डिलीट केल्या? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर अदनान सामीनं दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी अदनानने वजन कमी करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याची फॅट टू फिट जर्नी पाहून चाहते थक्क झाले होते. स्वतः अदनान सामीने त्याचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. पण नंतर सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट करुन अदनाननं अलविदा अशी पोस्ट शेअर केली होती. आता ही पोस्ट शेअर करण्यामागचे कारण अदनानं सांगितलं आहे. अदनानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अदनानं त्याच्या नव्या गाण्याची झलक शेअर केली आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'माझी अलविदा म्हणायची पद्धत'. अदनान सामीच्या नव्या गाण्याचं नाव अलविदा असं आहे.
पाहा पोस्ट:
अदनान सामीच्या पोस्टवर नेटकऱ्यांची रिअॅक्शन
अदनान सामीनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'वेलकम बॅक' अशी कमेंट काही नेटकऱ्यांनी केली आहे. तर युझर्सनं अदनानला त्याच्या या गाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा:
Adnan Sami : अदनान सामीचा सोशल मीडियाला रामराम? ‘अलविदा’ पोस्टमुळे चाहते संभ्रमात!