Adipurush Box Office Collection : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमातील काही दृश्यांमुळे आणि संवादांमुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण तरीही बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची यशस्वी घौडदौड सुरू आहे. 

'आदिपुरुष' या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या...  (Adipurush Box Office Collection)

'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 86.75 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 65.25 कोटींची कमाई केली होती. तर तिसऱ्या दिवशी वीकेंडला या सिनेमाने 67 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

'आदिपुरुष'ने जगभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

ओम राऊतचा (Om Raut) 'आदिपुरुष' हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. शाहरुखचा 'पठाण' या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. पण आता या सिनेमाने 'पठाण'चादेखील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'पठाण'ने तीन दिवसांत 166.75 कोटींची कमाई केली होती. तर 'आदिपुरुष'ने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

'आदिपुरुष' हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. रिलीजच्या पाच दिवसांत हा सिनेमा बजेट पूर्ण करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा 700-800 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

'आदिपुरुष' या सिनेमात प्रभास, कृती सेनन, देवदत्त नागे, सनी सिंह, सैफ अली खान आणि सोनल चौहान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत निर्मात्यांनी या सिनेमातले वादग्रस्त संवाद बलण्याचा निर्णय घेतला आहे. 'आदिपुरुष' या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. प्रभासचे चाहते या सिनेमाला पसंती दर्शवत आहेत. तर नेटकरी मात्र या सिनेमावर टीका करत आहेत. 

संबंधित बातम्या

Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती