Adinath Kothare: मराठी मनोरंजन विश्वात सध्या OTT प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंटची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. विविध धाटणीच्या कथा आणि प्रयोगशील विषयांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जात असताना, आदिनाथ कोठारे याची ‘डिटेक्टिव्ह धनंजय - रहस्यजाळ’ ही वेब सिरीज विशेष चर्चेत आली आहे. या सिरीज मधील आपल्या व्यक्तिरेखेपासून ते शूटिंग लोकेशनपर्यंत अनेक खास गोष्टींवर आदिनाथने मोकळेपणाने गप्पा मारल्या. शिरगावच्या सेटिंगमुळे निर्माण झालेली गूढता, सेटवरील इम्प्रोव्हायझेशन, आणि धनंजय या व्यक्तिरेखेसोबत जुळलेलं नातं याबद्दल त्याने अनेक रंजक खुलासे केले. त्याचबरोबर मराठी OTT कंटेंट कसा बदलतोय आणि प्रादेशिक कथाकथनाला कसा नवा आयाम मिळतोय, यावरही त्याने आपलं मत मांडलं.
1. शिरगावच्या गूढ लोकेशनची जादू
या शोचं बरंचसं शूटिंग भोरजवळ करण्यात आलं असून, त्या परिसरातील निसर्ग आणि गावांचं वातावरण खूप वेगळं आणि खास असल्याचं आदिनाथने सांगितलं. तो म्हणाला ' लोकेशनने नक्कीच आम्हाला हवी होती ती वाइब दिली. शोचा बराचसा भाग भोरजवळ शूट केला आहे, आणि तिथला निसर्ग व गावांचं वातावरण खूप वेगळं आणि खास आहे. आम्ही निर्माण केलेल्या काल्पनिक शिरगावला त्या ठिकाणामुळे एक गूढता आणि रहस्यमयपणा मिळाला.'
2. सेटवरची इम्प्रोव्हायझेशनची केमिस्ट्री
शूटिंगदरम्यान छोटूसोबतच्या सीनमध्ये बऱ्याच गोष्टी इम्प्रोव्हाइज केल्याचं आदिनाथने सांगितलं. माझ्या आणि छोटूच्या केमिस्ट्रीमधला बराचसा भाग सेटवर इम्प्रोव्हाइज केला होता, जो रंगा गोडबोले यांनी मार्गदर्शन करत विकसित केला. आम्ही एक खास मॅनरिझम तयार केलं, जिथे छोटू त्याच्या निरागसतेत काहीतरी बोलतो आणि धनंजय त्याला दुरुस्त करतो. तो त्याला त्रास देत नाही, पण कान धरून “एक फटका देईन” असं म्हणतो, आणि छोटू गोंडस पपी फेस करून होकार देतो. आम्हाला वाटलं की यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीमध्ये छान रंग भरला, आणि ही कल्पना रंगा दादांची होती. आमच्याकडे एक उत्कृष्ट दिग्दर्शक होता, ज्यामुळे धनंजय आणि छोटूची केमिस्ट्री इतकी छान खुलून आली. ' असं आदित्य म्हणाला.
3. धनंजयमधल्या सूक्ष्म गोष्टींकडे लक्ष
आदित्य म्हणाला 'मला आशा आहे की प्रेक्षक सगळ्या गोष्टी लक्षात घेतील. आजकालचे प्रेक्षक खूप स्मार्ट आहेत; ते अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीही ओळखतात, त्यामुळे त्यांनी ते पाहावं आणि शोचा आनंद घ्यावा, अशी माझी अपेक्षा आहे. '
4. प्रत्येक व्यक्तिरेखेतून काहीतरी जपून ठेवतो
लहानसहान गोष्टींवर बारकाईने लक्ष देणं, शंका घेणं आणि सतर्क राहणं—हे गुण माझ्यात आधीपासून आहेत. मी काही बाबतीत थोडा OCD आहे, त्यामुळे फक्त ते गुण अधिक ठळक करावे लागले. पण ते खूप जास्त वाढवणं योग्य नाही, कारण अति शंका घेणं समस्याही बनू शकतं. धनंजय यात संतुलन ठेवतो—गरज असेल तेव्हा सतर्क आणि बारकाईने पाहणारा, आणि त्याच वेळी वास्तववादी राहणारा. हे संतुलन खूप महत्त्वाचं आहे आणि ते माझ्यासोबत राहिलं आहे. असं आदित्य कोठारेनं सांगितलं .
तो पुढे म्हणाला,'मी प्रत्येक व्यक्तिरेखेतून काहीतरी जपून ठेवतो. उदाहरणार्थ, 100 Days मधील अजय ठाकूरचं बॅज अजून माझ्याकडे आहे. नशिबवान या मालिकेतलं एंगेजमेंट रिंग आहे. पाणी मधील हनुमान केंद्रेची तुलसी माळ माझ्याकडे आहे. आणि डिटेक्टिव्ह धनंजय - रहस्यजाळ साठी, मी त्याचे चष्मे जपून ठेवले आहेत, कारण ते माझ्यासाठी खूप खास होते. '
5. OTT वर मराठी कंटेंटचा नवा काळ
मराठी ZEE5 इतकं उत्तम कंटेंट सादर करत आहे याबद्दल मी खूप आभारी आहे. देवखेळ, उमेश कामत आणि प्रिया बापट यांचं हे काय नवीन, आणि डिटेक्टिव्ह धनंजय - रहस्यजाळ यांसारख्या प्रोजेक्ट्समधून ते वेगवेगळ्या प्रकारच्या कथा मांडत आहेत. ते प्रयोगशील आहेत, स्टीरिओटाइप्स मोडत आहेत, आणि विविध फॉरमॅट्स व जॉनर्स ह्यूमर, डार्क ह्यूमर, क्राइम ड्रामा, फॅन्टसी, हॉरर यांचा शोध घेत आहेत, जे खूपच छान आहे. ZEE5 च्या प्रोग्रामिंग टीमला हेमा, कल्याणी सलाम. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी कंटेंट उत्तम हातात आहे. प्रादेशिक कंटेंटसाठी हा खूप चांगला काळ आहे, कारण प्लॅटफॉर्म्स मराठी कंटेंटमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्याचं उत्तम प्रमोशनही करत आहेत. असं आदित्य कोठारेने सांगितलं.
