Shakti Kapoor sells apartment : शक्ती कपूर असे अभिनेते आहेत, ज्यांनी कधीकाळी बॉलिवूड चांगलंच गाजवलं. त्यांनी अनेक चित्रपटांत केलेल्या खलनायकाच्या भूमिका आजही तेवढ्याच ताज्या आहेत. त्यांनी आतापर्यंत विनोदी, खलनायक, नायकांचेही पात्र साकारले आहेत. सध्यातरी ते सिनेक्षेत्रात तेवढे सक्रिय नाहीत. दरम्यान, याच शक्ती कपूर यांच्या एका घराविषयी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 

6.11 कोटींना विकले अपार्टमेंट

मिळालेल्या माहितीनुसार शक्ती कपूर यांनी आपले एक अपार्टमेंट विकले आहे. एकूण 881 स्क्वेअर फुटांचे हे अपार्टमेंट शक्ती कपूर यांनी एकूण 6.11 कोटी रुपयांना विकले आहे. मुंबईतील अत्यंत महागडा समाजल्या जाणाऱ्या जुहू या परिसरात सिल्व्हर बिच हेवन या इमारतीत हे आलिशान अपार्टमेंट होते. 

श्रद्धा कपूरने घर दिलं होतं गिफ्ट 

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने वडील शक्ती कपूर यांना हे अपार्टमेंट भेट म्हणून दिले होते. या अपार्टमेंटची 50 टक्के मालकी श्रद्धा कपूरकडे होती. मात्र आई शिवांगी कपूर यांच्याप्रमाणेच श्रद्धा कपूरनेही आपली ही मालकी शक्ती कपूर यांना दिली होती. आता हेच अपार्टमेंट शक्ती कपूरने 6.11 कोटी रुपयांना विकले आहे.

आगामी कोणत्या चित्रपटात दिसणार? 

दरम्यान, शक्ती कपूर यांच्याबाबत बोलायचं झालं तर ते याआधी अॅनिमल या चित्रपटात दिसले होते. तर शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर हिचा स्त्री-2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. श्रद्धा कपूरच्या पुढच्या चित्रपटाविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी याच्यासोबतच्या नात्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.  नुकतेच ती तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली होती. वाढदिवस साजरा करून ती परतली असताना तिचे फोटो समोर आले होते.  

हेही वाचा :

काय सांगता? रोहित शर्मा होता 'या' सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात? दोघेही होते रिलेशनशीपमध्ये; खुद्द हिरोईनच म्हणाली की, मी त्याला....

त्यांच्या प्रेमाची देशभरात चर्चा, जिथं-तिथं दिसायचे एकत्र, पण तमन्ना-विजय वर्मा यांचं ब्रेकअप? नव्या माहितीमुळे सर्वांच्याच भवुया उंचावल्या!

Maharani 4 Teaser Huma Qureshi: राणी पुन्‍हा आली आहे! सोनी लिव्‍हची सिरीज 'महाराणी 4'च्‍या टीझर प्रदर्शित; शक्तिशाली, साहसी राणी भारती