Actress Tabu spoke Marathi in Filmfare Awards Marathi 2025 : मराठी फिल्मफेअर अवार्ड सोहळा नुकताच पार पडला. या मराठी फिल्मफेअर सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अभिनेता नवाजउद्दीन सिद्दिकी, अभिनेत्री तब्बू, अभिनेता राजकुमार रावसह अनेक बॉलिवूड कलाकार मराठी फिल्म फेअर अवार्डच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. दरम्यान, संपूर्ण सोहळ्या अभिनेत्री तब्बू हिने खास लक्ष वेधलं. तब्बू या कार्यक्रमात मराठी भाषेत व्यक्त झालेली पाहायला मिळाली. शिवाय, तिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे आभार मानत असताना त्यांना मिठी देखील मारली. तब्बूचा हा व्हिडीओ फिल्मफेअरने शेअर केला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
अभिनेत्री तब्बू काय काय म्हणाली?
"नमस्कार.. मी खूप खूश आहे. मला तुम्ही सन्मान दिलात, यासाठी खूप खूप आभार.. मी हे अवार्ड असा दिग्दर्शकाला देते आहे, ज्याने मला माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा सिनेमा आणि भूमिका दिली.. " असं तब्बू म्हणाली. तिने यावेळी महेश मांजरेकर यांचे नाव जोराने पुकारलेलं देखील पाहायला मिळालं. दरम्यान, यानंतर महेश मांजरेकर स्टेजवर गेले आणि तब्बूने त्यांना मिठी देखील मारली. फिल्मफेअरने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. शिवाय तब्बू मराठी भाषेत व्यक्त झाल्याने तिच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव देखील केलाय.
सिनेक्षेत्रातील कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, तब्बू सध्या अक्षय कुमारसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तब्बू 'भूत बंगला' चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात परेश रावल देखील दिसणार आहेत. बऱ्याच काळानंतर प्रियदर्शन आणि अक्षय कुमार एकत्र काम करत आहेत. याआधी त्यांनी हेरा फेरी, भागम भाग, गरम मसाला, दे देना दान आणि भूल भुलैया या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तब्बू औरों में कहां दम था ते क्रू, भोला, गुप्ता, कुट्टे, दृश्यम 2, भूल भुलैया 2 झळकलेली पाहायला मिळाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
साताऱ्यातील वाई तालुक्यात बॉलिवूडच्या कोण कोणत्या सिनेमांचं शूटिंग झालंय?
