महिलेला नग्न दाखवल्याने 100 लोक आणखी येतील असं त्यांना वाटतं, स्मिता पाटील यांची जुनी मुलाखत व्हायरल VIDEO
Actress Smita Patil old interview : महिलेला नग्न दाखवल्याने 100 लोक आणखी येतील असं त्यांना वाटतं, स्मिता पाटील यांची जुनी मुलाखत व्हायरल

Actress Smita Patil old interview : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Actress Smita Patil) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये भारतीय चित्रपट आणि भारतीय प्रेक्षकांबाबत भाष्य करताना दिसत आहेत. या मुलाखतीत स्मिता पाटील म्हणाल्या होत्या की, हिरोला नग्न दाखवू शकत नाहीत. त्याने काही होणार देखील नाही. मात्र, महिलेला नग्न दाखवलं तर त्यांना वाटतं की, 100 लोक आणखी येतील. भारतीय प्रेक्षकांवर एक गोष्ट फोर्स करण्यात आलीये की, पाहा या सिनेमात सेक्स आहे. या सिनेमात अर्धनग्न शरीर आहेत. तुम्ही सिनेमा पाहायला या"...स्मिता पाटील (Actress Smita Patil) यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद देताना दिसत आहेत.
प्रतिभाशाली आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांची ओळख
भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर अढळ स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत स्मिता पाटील हे नाव नेहमीच गौरवाने घेतलं जातं. त्या केवळ एक अभिनेत्री नव्हती, तर समाजातील वास्तव दर्शवणाऱ्या भूमिकांची प्रखर भान असलेल्या कलाकार होत्या. त्यांच्या अभिनयातून एक प्रकारचं सत्य आणि सामाजिक जाणीव प्रकट होत असे.
स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील शिवाजी पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार होते, तर आई विद्या पाटील शिक्षिका होत्या. तिचे बालपण एका सुजाण, विचारशील कुटुंबात गेले. त्यांनी पुण्यात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदवी मिळवली.
स्मिता पाटील यांची मुलाखत पाहाण्यासाठी येथे क्लिक करा..
चित्रपटसृष्टीतील पदार्पण
स्मिता पाटील यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात दुरदर्शनवरील वृत्तनिवेदिका म्हणून केली. त्यानंतर त्या श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आल्या. पुढे त्यांनी निशांत (1975), मंथन (1976), भूमिका (1977) यासारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्या पॅरेलल सिनेमा म्हणजेच समांतर चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा चेहरा बनल्या होत्या.
स्मिता पाटील यांच्या अभिनयातील सादरीकरण हे नेहमी संयत आणि भावपूर्ण असे. त्यांनी महिलांच्या व्यथा, संघर्ष, आत्मनिर्भरता यांचं जिवंत चित्रण केलं. त्यांचे चेहरेवरील भाव, संवादफेक आणि देहबोलीतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली.
महत्वाचे चित्रपट
भूमिका (1977) – यात एका गायक स्त्रीची आत्मकहाणी साकारली.
मंथन (1976) – शेतकऱ्यांच्या दुग्धक्रांतीशी संबंधित चित्रपट.
चक्र (1981) – झोपडपट्टीत राहणाऱ्या स्त्रीचा संघर्ष.
आक्रोश, अर्धसत्य, नमक हलाल, बाजार, मिर्च मसाला, मिर्झा गालिब हे इतर उल्लेखनीय चित्रपट होते.
त्यांनी काही हिंदी व्यावसायिक चित्रपटांतही काम केलं जसं की नमक हलाल, शक्ति आणि सौदागर.
पुरस्कार आणि सन्मान
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – भूमिका (1977) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.
फिल्मफेअर पुरस्कार – अनेक नामांकित चित्रपटांसाठी.
पद्मश्री पुरस्कार – 1985 मध्ये भारत सरकारकडून सन्मानित.
स्मिता पाटील यांनी अभिनेते राज बब्बर यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर त्यांना प्रतीक बब्बर नावाचा एक मुलगा आहे, जो आज अभिनेता आहे. दुर्दैवाने, 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी स्मिता पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूने चित्रपटसृष्टी हादरून गेली होती..स्मिता पाटील यांची ओळख एक विचारशील आणि स्त्रीवादी अभिनेत्री म्हणून होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या























