Sanchita Ugale Chats goes viral: टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेनं (Sanchita Ugale) आत्महत्या केली आणि सिनेसृष्टीत खळबळ उडाली.  संचिताचे नातेवाईक आणि तिचे कलाकार मित्र मंडळींनी (Sanchita Ugale Death) अलिकडेच या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. संचिताने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास सुरू आहे.  पोलिसांना या प्रकरणी अनेक धागेदोरे सापडले आहेत.  पोलिसांनी संचिताचा मोबाईल जप्त केला आहे. पोलीस संचिताचे चॅट्स आणि गॅलरीतील फोटो तपासात आहेत. यातून कोणता पुरावा सापडतोय का? याचा तपास पोलीस करत आहेत. फोनमधून काही तरी डिलिट झाल्याचं संशय येताच, फोन फॉरेन्सिकमध्ये पाठवण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

संचिताला डिप्रेशनचा त्रास? (Sanchita Ugale Health Condition)

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  संचिता गेल्या 6 महिन्यांपासून डिप्रेशनवर उपचार घेत होती.  दरम्यान, संचिताचे डॉक्टरसोबतचे चॅट्स पोलिसांच्या हाती आले आहेत. पोलीस डॉक्टरांकडूनही संचिताच्या डिप्रेशनमागील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. संचिताला नेमका कोणता त्रास होता? डॉक्टरांकडून पोलीस  ही बाब जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, संचिता उगलेच्या कुटुंबाचा आरोप आहे की, टेलिव्हिजनमध्ये काम करत असताना अभिनेत्री स्ट्रेसमध्ये असायची. संचिता आणि डॉक्टरांमध्ये नेमकं काय बोलणं झालं? याचे कथित चॅट्स ABPच्या हाती आले आहेत. 

Continues below advertisement

संचिता आणि डॉक्टरांचे चॅट्स

डॉक्टर - खराब फ्यूचर?संचिता - मला असं वाटतं की, मला मेंदूची गंभीर समस्या आहे. फोकस वीक झाला आहे. मला काही ऐकू येत नाही.डॉक्टर -  तुम्हाला माझ्यासोबत ऑनलाइन सेशन घ्यायचे आहे का?संचिता- हो, नक्कीच. डॉक्टर -  तुम्ही जेव्हा हवं, माझ्यासोबत बोलू शकता. संचिता- माझी तब्येत कधीच बरी नसते. माझं कामात लक्ष नसतं.  डॉक्टर - तुम्ही चिंता करु नका.  मी तुम्हाला ठीक करण्याचे प्रयत्न करेन. संचिता - कधी? गेले 6 महिने मी खूप विचित्र वागत आहे. लोक मला घाबरतात.  डॉक्टर - आम्हाला आपले सेशन लवकर सुरू करावे लागतील. त्याशिवाय काहीच सांगता येणार नाही. पहिले आपले ऑनलाइन सेशन होतील. जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल व्हाल, तेव्हा आपण फेस-टू-फेस सेशन सुरू करूयात. मला तुमच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. भूतकाळाबद्दलही जाणून घ्यायचं आहे. तेव्हा मी तुमच्यावर कॉन्फिडेंटली उपचार करु शकेन.संचिता - मी माझा सर्व पैसा यावर खर्च केला आहे. पण कोणतीच थेरेपी माझ्यावर काम करत नाहीये.डॉक्टर - पॉझिटिव्ह रहा,  देवावर विश्वास ठेवा.संचिता - माझ्यात कॉन्फिडेन्स, विश्वास नाहीये.डॉक्टर - मग तुम्हाला माझ्याकडून कोणती मदत हवी आहे?संचिता - मला नाही माहित. पण बघू पुढे काय वर्क करेल.डॉक्टर - तब्येतीची काळजी घ्या.संचिता - हां.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सोनू निगम देतोय गंभीर आजाराशी झुंज; घसा बसला अन्...कॉन्सर्टपूर्वी गायकानं VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं