Ruchi Gurjar News : "सो लॉन्ग व्हॅली" (So Long Valley) चित्रपटाचे निर्माते करण चौहान यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. कारण बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल रुची गुर्जरने त्यांच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. रुची गुर्जरने चित्रपट निर्माते करण सिंह चौहान यांच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली ओशिवरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. अशातच सो लॉन्ग व्हॅली चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये अभिनेत्री रुची गुर्जरने प्रचंड गोंधळ घातला आहे. हा प्रीमियर अंधेरी येथील सिनेपोलिस थिएटरमध्ये होता. यावेळी तिथे रुची काही महिलांसह आली होती. यावेळी तिने चित्रपट निर्माता करण सिंग चौहानला सँडलने मारहाण केली आहे.
यावेळी अंधेरी येथील सिनेपोलिस थिएटरमध्ये इतका गोंधळ झाला की पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले आहे.अभिनेत्री रुची गुर्जरने चित्रपट निर्माता करण सिंग चौहानविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात फसवणूक, गुन्हेगारी विश्वासघात आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. रुचीचा आरोप आहे की करणने तिची 24 लाख रुपयांची फसवणूक केली.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचीने 24 जुलै 2025 रोजी करणविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 318 (4), 352 आणि 351 (2) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. रुचीने दावा केला आहे की करण सिंह चौहानने तिच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. त्यानंतर त्याने सांगितले की तो एका हिंदी मालिकेचा निर्माता आहे आणि सोनी टीव्हीवर शो सुरू करण्याचे आश्वासनही दिले होते. तसेच त्याने सह-निर्माता म्हणून सामील होण्याची ऑफर दिली होती. प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे देखील पाठवण्यात आली. या गोष्टींवर विश्वास ठेवून रुचीने त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले. आजपर्यंत प्रकल्पावर कोणतेही काम सुरू झालेले नाही, वारंवार संपर्क साधूनही खोटे आश्वासन दिले जात असल्याची माहिती रुचीने पोलिसांना दिली आहे. करण सिंगने 27 जुलै 2025 रोजी प्रदर्शित होणाऱ्या “सो लॉन्ग व्हॅली” या चित्रपटासाठी पैसे खर्च केले आहेत.जेव्हा तिने तिच्या पैशांच्या परतफेडीबद्दल त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा चौहानने तिला धमकावण्यास सुरुवात केली. रुची गुर्जर हिने यापूर्वी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला नेकलेस घातल्यामुळे ती चर्चेत आली होती.
महत्वाच्या बातम्या:
1.5 कोटीचं बजेट अन् सिनेमाने कमावले होते 19 कोटी, शूटिंगवेळी दिग्दर्शक पालखीत बसून यायचा