Actress Scared To Deliver A Daughter: 'मला बंदूक सोबत ठेवावी लागणार...', भारतातील परिस्थिती पाहून मुलीला जन्म द्यायला घाबरलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री
Actress Scared To Deliver A Daughter: एक अशी बॉलिवूड अभिनेत्री, जिला देशातील सद्दस्थिती पाहून मुलीला जन्म द्यायला भिती वाटत होती.

Actress Scared To Deliver A Daughter: अनुष्का शर्मा (Anushka Sharma), आलिया भट्ट (Alia Bhatt), दीपिका पादुकोण (Deepika Padukon), कियारा अडवाणी यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्रींनी गेल्या काही वर्षांत बाळाला जन्म दिला आहे. आई झालेल्या या सौंदर्यवती अनेकदा पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होत असतात. बहुतेक बॉलिवूड अभिनेत्रींना (Bollywood Actress) कन्यारत्न प्राप्त झालं आहे. या यादीत लिया भट्ट, दीपिका पदुकोण, रिचा चड्ढा ( Richa Chadha), अथिया शेट्टी ते कियारा अडवाणी यांचा समावेश आहे. पण, आज बॉलिवूडव राज्य करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एक अभिनेत्री अशी होती, जी मुलीला जन्म द्यायला घाबरत होती. स्वतः अभिनेत्रीनं याबाबत खुलासा केला आहे.
आम्ही ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव रिचा चड्ढा. तिनं काही दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. या अभिनेत्रीनं अलिकडेच लिली सिंहला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, ती बाळाल जन्म देताना फार गोंधळलेली होती. आपल्या देशातील परिस्थिती पाहून रिचा चड्डाला देशात मुलीला जन्म द्यायला भिती वाटत होती, असं तिनं सांगितलं.
"मूल जन्माला घालणं, उत्तम आयडिया आहे?"
रिचा चड्ढा आपल्या गरोदरपणाबाबत बोलताना म्हणाली की, "मी थोडी घाबरले होते, क्लायमेट चेंज आहे, नरसंहार आहे, जगात खूप गडबड-गोंधळ सुरू आहे. मूल जन्माला घालणं उत्तम आयडिया आहे? जेव्हा तुम्ही पूर्णपणे इंडिपेंडेंट असता, तेव्हा ही गोष्ट पूर्णपणे बदलून जाते. कारण तुम्ही एका व्यक्तीसाठी जबाबदार असता. कमीत कमी आधीच्या सहा महिन्यांपर्यंत मुलाला न्हाऊ-माखू घालणं, ही मोठी जबाबदारी आहे."
View this post on Instagram
"मला बंदूक खरेदी करावी लागणार आहे..."
अभिनेत्रीनं पुढे बोलताना सांगितलं की, जेव्हा तिला कळालं की, तिनं एका मुलीला जन्म दिला आहे. तेव्हा मात्र ती खूप घाबरली. रिचा चड्ढा म्हणाली की, "माझी सुरुवातीची प्रतिक्रियाच भिती होती. मी विचार करत होते की, हे देवा... आता माझं आयुष्य संपलं? मी विचार केला की, आम्ही भारतात राहतो, मला बंदूक खरेदी करायची असते. पण, नंतर मी विचार केला की, नाही... मी पाहून घेईन... आम्ही तिला माझ्यासारखंच खंबीर बनवणार..."
रिचा चड्ढानं मुलीचं नाव काय ठेवलं?
रिचा चड्ढानं अभिनेता अली फजलसोबत 2022 मध्ये आपली लग्नगाठ बांधलेली. लग्नाच्या दोन वर्षांनी 2024 मध्ये जोडप्यानं आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. रिचानं एका मुलीला जन्म दिला, जिचं नाव त्यांनी जुनैरा इदा फजल असं ठेवलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















