मुंबई : बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी रेखा या अभिनेत्रीचे आजही लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य आहे. आजही लोक रेखाच्या सौंदर्याचे दिवाने आहेत. वयाची 70 वर्षे झालेली असली तरी अजूनही ही अभिनेत्री तिशीतली दिसते. या अभिनेत्रीने तरूण वयात अनेक हिट चित्रपट दिले. रेखा या बॉलिवूडचे मेगा स्टार अमिताभ बच्चन यांच्यावर खूप प्रेम करायच्या, असं नेहमीच म्हटलं जातं. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाविषयी बोलताच रेखा यांनी मन मोकळं केलं आहे. त्यांनी हसून मला सगळं विचारा...मला एक-एक डायलॉग पाठ आहे, असं मिश्कील भाष्य केलंय. 


कपिल शर्माच्या शोमध्ये रेखा प्रमुख पाहुणी


नेटफ्लिक्सवर शनिवारी रात्री 8 वाजता 'द ग्रेड इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाचा नवा भाग येणार आहे. या भागाचे काही प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या प्रोमोनुसार यावेळी शनिवारी द ग्रेड इंडियन कपिल शो या कार्यक्रमात रेखा या प्रमुख पाहुणी असणार आहेत. त्यांच्याशी कपिल शर्मा गप्पा-गोष्टी तसेच धम्माल करताना दिसतोय. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये रेखा थेट नृत्य करताना दिसतायत. याच कार्यक्रमात रेखा यांनी कौन बेनगा करोडपती या कार्यक्रमावर भाष्य केलंय. 


केबीसीचा उल्लेख करताच रेखा म्हणाल्या....


या प्रोमोनुसार कपिल शर्मा रेखा यांच्या बाजूला बसून गप्पा मारताना दिसतोय. गप्पा मारत असताना कपिल शर्माने अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी या कार्यक्रमाचा उल्लेख केला. "मी एकदा या कार्यक्रमात गेलो होतो. माझी आई पुढच्या रांगेत बसली होती. यावेळी बच्चन साहेबांनी माझ्या आईला देवीजी तुम्ही नेमकं काय खाल्लं होतं, ज्याने कपिल शर्मा यांच्यासारख्या अवलियाचा जन्म झाला, असं विचारलं" असं कपिल म्हणाला. बच्चन यांच्या या उत्तराला कपिल शर्मा यांच्या आईने दाल रोटी असं उत्तर दिलं होतं. मात्र रेखा यांनी कपिलला लगेच थांबवत स्वत:च "दाल रोटी" असं उत्तर दिलं. म्हणजेच मला केबीसी या शोबाबत सर्वकाही माहिती आहे, असं रेखा यांना सांगायचं होतं. तसंच "मला विचारा की मला या शोमधील एक-एक डायलॉग माहिती पाठ आहे," असं मिश्कील भाष्य केलं. रेखा यांच्या या बोलण्याने कपिल शर्माच्या शोमध्ये आलेल्या प्रेक्षकांत एकच हशा पिकला. 


उमराव जान चित्रपटाचा सिन रिक्रिएट


दरम्यान, याच शोमध्ये रेखा आपल्या उमराव जान या चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या चित्रपटात रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी नायक-नायिकेची भूमिका साकारली होती. रेखा यांनी डान्स करत उमराव जान या चित्रपटातील सीन रिक्रिएट केला आहे.  


हेही वाचा :


Salman Khan : मोठी बातमी! भाईजानच्या शुटींगच्या सेटवर अज्ञात व्यक्तीची घुसखोरी, चौकशी करताच म्हणाला, 'बिश्नोईला सांगू का...'


Priya Bapat : प्रिया बापटचे 'गोल्डन हॉट' फोटो, सोशल मीडियाचं तापमान वाढलं!


Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding: दाक्षिणात्य लग्नाची झलक, सोज्वळ सोहळा; नागा चैतन्य - शोभिता धुलिपाल अडकले लग्नबंधनात; पाहा फोटो