Actress Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजयच्या कथित प्रेमसंबंधांची चर्चा नेहमीच होते आणि चाहतेही त्यांच्या नात्याबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. मात्र या चर्चांमुळे दोघांच्या पूर्वीच्या लव्हस्टोरी लोक विसरुन जातात. विशेषतः रश्मिकाबाबत बोलायचं झालं तर, तुला माहीत आहे का की, ती कधीकाळी कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीच्या प्रेमात पडली होती. सध्या रश्मिका मंदाना आणि अभिनेता रक्षित शेट्टीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, त्यांच्या नात्यात दुरावा का आला? आणि ते कशामुळे वेगळे झाले? हे जाणून घेऊयात..
रश्मिका आणि रक्षित शेट्टीची भेट 2016 मध्ये आलेल्या एका कन्नड चित्रपटाच्या सेटवर झाली. तेव्हा रक्षित हा आधीपासूनच नावाजलेला अभिनेता होता, पण रश्मिकासाठी हा तिचा पहिलाच चित्रपट होता. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि वर्षभरात म्हणजेच जुलै 2017 मध्ये त्यांनी साखरपुडा केला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो तेव्हाचाच आहे. ज्यामध्ये हे दोघं सेम ड्रेसिंग स्टाईलमध्ये केक कापताना आणि अंगठी घालताना दिसतात, त्यांच्यासोबत कुटुंबिय आणि मित्रही उपस्थित आहेत. या साखरपुड्याच्या वेळी रश्मिका फक्त 21 वर्षांची होती तर रक्षित 34 वर्षांचा होता. पण त्यानंतरच्या एका वर्षातच त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी साखरपुडा मोडून टाकला. त्यांनी कधीच एकमेकांवर दोष ठेवला नाही किंवा का ब्रेकअप झाला याबद्दल बोललं नाही, कितीही चर्चा झाली तरीही.
रश्मिका मंदाना आज जरी टॉलिवूडपासू ते बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवत असली तरी फार थोड्या लोकांना माहित आहे की तिने खूप लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. जर हे लग्न झालं असतं, तर कदाचित रश्मिका आज इतकी मोठी स्टार बनली नसती. होय, ही गोष्ट खरी आहे की रश्मिका मंदानाचा साखरपुडा फक्त 21 व्या वर्षीच झाला होता. त्यानंतर रश्मिका सातत्याने सिनेक्षेत्रात काम करत राहिली आणि तिचं नाव विजय देवरकोंडासोबत जोडलं जात आहे. मात्र रश्मिका आणि विजयने याबद्दल कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही.
रश्मिका मंदाना सातत्याने चित्रपट करत आहे आणि अलीकडेच ती पुष्पा 2 आणि सलमान खानसोबत सिकंदर या चित्रपटात दिसली होती. दोन्ही चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. चाहते तिच्या एका झलकसाठी उत्सुक असतात आणि तिच्या गोंडस एक्सप्रेशन्सवर फिदा असतात. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या