Actress Rambha Daughters Are Beautiful: 'दुनिया मे आयी तो हो लव्ह कर लो' हे सलमान खानच्या 'जुडवा' सिनेमातलं गाणं, ज्यामध्ये करिश्मा कपूरसोबत (Karisma Kapoor) एक दिग्गज अभिनेत्री झळकली आहे. ती म्हणजे, रंभा (Rambha). तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवणारी रंभा आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्यानं तरुणाईला वेड लावणारी रंभा आजही तितकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. आज रंभा पन्नाशीच्या उंबरठ्यावर असून तीन मुलांची आई आहे. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. रंभा आता टीव्ही शो होस्ट करते आणि अनेक शोमध्ये जज म्हणून देखील उपस्थित असते. पण, आजही आपल्या सौंदर्यानं भूरळ घालणाऱ्या रंभाच्या दोन लेकी तिच्यापेक्षाही सुंदर आहेत.
रंभा हिनं 2010 मध्ये कॅनडास्थित श्रीलंकेच्या तमिळ व्यावसायिकाशी लग्न केलं आणि नंतर टोरंटोमध्ये स्थायिक झाली. अभिनेत्रीला साशा पद्मनाथन आणि लावण्या पद्मनाथन या दोन मुली आहेत. अभिनेत्रीच्या दोन्ही मुली आईसारख्याच सुंदर आहेत. लग्नानंतर दुसऱ्याच वर्षात रंभानं मुलगी लावण्या, त्यानंतर 2015 मध्ये साशा आणि 2018 मध्ये शिविनला जन्म दिला. रंभाची मोठी मुलगी 14 आणि लहान मुलगी 10 वर्षांची आहे. तर, मुलगा 7 वर्षांचा आहे.
रंभाची मोठी मुलगी लावण्या तर आई रंभापेक्षाही सुंदर आहे. रंभा आपला पती आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. आज जर रंभाच्या मुलींनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं, तर भल्याभल्या स्टार किड्सना त्या मागे टाकतील.
रंभा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांसोबत फॅमिली फोटो शेअर करत असते. यामध्ये ती आपल्या मुलींचेही फोटो शेअर करतेय. इन्स्टाग्रामवर तिचे एक मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. रंभाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, फिल्म जल्लादमधून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, कहर, जुड़वां, घरवाली बाहरवाली, बंधन, जानी दुश्मन एक अनोखी कहानी यांसारखे अनेक गाजलेले सिनेमे केले. रंभा शेवटची बॉलिवूडमध्ये 'प्यार दीवाना होता है' या चित्रपटात दिसली होती. अभिनेत्रीनं तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :