Actress Rajeshwari Kharat  : संजू राठोड (Sanju Rathod) अनेक गाणी सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय असतात. सध्या त्याचं 'एक नंबर तुझी कंबर' (Ek Number Tujhi Kambar) सोशल मीडियावर ट्रेंडिगला आहे. नेटकऱ्यांनी या गाण्याला तुफान प्रतिसाद दिलाय. अनेक सेलिब्रिटी संजू राठोडच्या या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) देखील यामध्ये मागे राहिलेली नाही. राजेश्वरीने (Actress Rajeshwari Kharat) 'एक नंबर तुझी कंबर' या संजू राठोडच्या गाण्यावर डान्स केलाय. यावेळी तिने लाल साडी नेसलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजेश्वरी खरातचा हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झालाय. लोकांनी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. एकाने कमेंट केली आहे की, टिकली असती तर तू आणखी छान दिसली असती. राजश्वेरी (Actress Rajeshwari Kharat) तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी काही फोटो शेअर करत असते. मात्र, आज तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) हिने 'बाप्तिस्मा' हा ख्रिश्चन धर्मातील विधी पूर्ण केला होता. मात्र, तिने 'बाप्तिस्मा'बद्दल माहिती दिल्यानंतर आणि फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत होते. दरम्यान, राजेश्वरी खरातचं हे ट्रोलिंग अजूनही थांबलेलं नाही. राजेश्वरी खरातला तिच्या ख्रिश्चन असण्यावरुन सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. 

दरम्यान, संजू राठोडच्या (Sanju Rathod) 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय. यूट्यूबवर या गाण्याला मिलियनमध्ये व्ह्यूज आले आहेत. यापूर्वी संजू राठोडचं गुलाबी साडी हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं होतं. काही दिवसांपूर्वी संजू राठोडने हे गाणं आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान देखील गायलं होतं. यूट्यूबवर देखील गुलाबी साडी या गाण्याला 20 कोटी व्ह्यूज मिळाले होते. अगदी चिमुकल्यांमध्ये देखील संजू राठोडच्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळाली आहे. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Raid 2 Box Office Collection Day 15: 'रेड 2' ला इतिहास रचण्यासाठी फक्त 15 कोटींची गरज, या वर्षातील 'छावा' नंतर सर्वाधिक कमाई करणारा ठरेल दुसरा चित्रपट, एकूण कलेक्शन किती?