Priya Berde Say About Gautami Patil: 'जोपर्यंत बघणारे थांबणार नाहीत, तोपर्यंत हे असंच चालू राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बर्डे (Priya Berde) यांनी गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) होणाऱ्या शो आणि लावणी कार्यक्रमावर दिली आहे.' सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटील हिच्या लावणीवरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे. गौतमी पाटीलकडून अश्लील नृत्य होत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. याबाबत नुकतीच प्रिया बेर्डे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाल्या प्रिया बेर्डे?


गौतमी पाटीलच्या शोबाबत बोलताना सांगलीमध्ये प्रिया बर्डे यांनी सांगितलं, 'या सर्व गोष्टीला बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे,जो पर्यंत हे शो बंद करत नाहीत, तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही आणि राज्यकर्ते यांनी कितीही ओरडून आणि निषेध करून काही होणार नाही.'


'लोक खूप मानधन देऊन त्यांना आणतात,आम्ही काही बोललो की आम्हालाही ट्रोल केले जाईल, याचा अर्थ असं नाही,की आम्ही बोलणार नाही,आम्ही बोलणार. पण लोक जोपर्यंत बघणं बंद करत नाही, तोपर्यंत या गोष्टी चालणार'अशी खंत देखील अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगलीमध्ये बोलताना व्यक्त केली आहे.


अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उपस्थितीत नाशिक येथे बेर्डे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. अफलातून, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, चल धर पकड या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच त्या अनाडी आणि  हम आपके है कौन या हिंदी चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. 


गौतमीचं 'तेरा पता' हे गाणं नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी गौतमी सज्ज आहे. गौतमीचा 'घुंगरू' (Ghungroo) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'मी करते तुम्हाला मुजरा' ही तिची लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Raghuveer Khedkar on Gautami Patil: लोककलेची 'गौतमी पाटील' करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल; ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा घणाघात