Prajakta Mali interview On Social Media: महाराष्ट्राची क्रश अर्थात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्रीने चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  प्राजक्ता केवळ प्रोफेशनल नसून वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते. अभिनेत्रीने सिनेइंडस्ट्रीत बरीच वर्षे काढली आहेत. अलिकडेच अभिनेत्रीने 'ABP माझा'च्या 'माझा महाराष्ट्र माझा व्हिजन' या  इव्हेंटला उपस्थिती दर्शवली. यावेळी तिनं आपल्या ब्रँडपासून सिनेसृष्टीतील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.  

Continues below advertisement

सोशल मीडियाबाबत प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली? (Prajakta Mali on social media)

अॅक्टर म्हणून सोशल मीडियाची स्ट्रॅटजी आणि बिझनेस वूमन म्हणून सोशल मीडियाची स्ट्रॅटजी यात काही बदल आहे का? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला, यावर  प्राजक्ता म्हणते, 'सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचता. नाटकात मी काम करत नाही. आम्हाला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियात वाचायला मिळतात.   आपल्या आयुष्याशी निगडीत माहिती देण्यासाठी, चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया हे माध्यम खूप चांगलं आहे'.

आपल्या ब्रँडबाबत प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणाली? (Prajakta Mali business and brand strategy)

'सोशल मीडिया हे कमाईचेही साधन आहे.  आमचं ई- कॉमर्सचं बिझनेस आहे. फिजिकल स्टोर असं नाही. ब्रँडसाठी काम करताना, रिसर्च आणि अप्रूव्हलचा भाग माझ्याकडे ठेवला आहे. दागिना आधी माझ्याकडे येतो, जोपर्यंत मी दागिना अप्रूव्ह करत नाही, तोपर्यंत दागिना बाजारात येत नाही', असं प्राजक्ता म्हणाली. सोशल मीडियाचा वापर फिल्म पाडण्यासाठी कसा होतो, याबाबत प्राजक्ता म्हणते, 'असे काही लोक आहेत, जे सोशल मीडियाचा गैरवापरही  करतात.  मला असे काही सिस्टम्स आणि संस्था माहित आहे, जे दुसऱ्या संस्थेकडून पैसे घेऊन दुसऱ्या संस्थेला डागळण्यासाठी काम करतात'.

Continues below advertisement

'एका सिनेमाला पाडण्यासाठी आणि ट्रोल करण्यासाठी दुसऱ्या फिल्मची टीम काम करते' (How films are targeted through trolling)

 

'पॉलिटिकलसह सिनेसृष्टीतही अशा गोष्टी घडतात. एका सिनेमाला पाडण्यासाठी आणि ट्रोल करण्यासाठी दुसऱ्या फिल्मची टीम काम करते.  हे अत्यंत चुकीचं आहे. मराठी इंडस्ट्रीत कमी प्रमाणात घडतंय. पण हिंदी सिनेसृष्टीत जास्त प्रमाणात होत आहे. आपला ब्रँडच्या प्रसिद्धीसाठी कमी पैसे घालतात, दुसऱ्या ब्रँडला पाडण्यासाठी जास्त पैसे खर्च करतात', असा खुलासा प्राजक्ता माळीने केला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

महाराष्ट्रात 'राजा शिवाजी' चित्रपटाचा बोलबाला, अकलूजमध्ये पोस्टरवर दुग्धाभिषेक; फटाकेही फोडले, PHOTOs