Actress Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत (Actress Pooja Sawant) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमी ती लाईफ अपडेट्स शेअर करत असते. आता पूजा सावंत हिने ऑस्ट्रेलिया ट्रीपवर आहे. तिने इन्स्टाग्रामवर या ट्रीपचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. पूजा सावंतने (Actress Pooja Sawant) शेअर केलेल्या या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. "कांगारुच्या देशी 🦘koala 🐨 च्या कुशीत ✨💕कांगारुच्या देशी 🦘koala 🐨 च्या कुशीत ✨💕" असं कॅप्शन पूजा सावंत हिने दिलंय.
यावेळी अभिनेत्री पूजा सावंत (Actress Pooja Sawant) हिने Denim jacket परिधान केलं असून तिने ब्लॅक कॅप देखील घातली आहे. पूजा सावंत हिने सिनेमाच्या माध्यमातून मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पूजा सावंत ही एक अभिनेत्री, नृत्यांगना आणि मॉडेल आहे. ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करते. 2015 मध्ये आलेल्या 'दगडी चाळ' या गाजलेल्या चित्रपटातील भूमिकेसाठी ती विशेष ओळखली जाते. तिने 'भेटली तू पुन्हा' या चित्रपटातील अभिनयासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारात 'सर्वोत्तम अभिनेत्री'चा पुरस्कार देखील मिळवला आहे.
तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2010 साली सचित पाटील दिग्दर्शित आणि अनेक कलाकारांनी युक्त असलेल्या 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून केली. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी, 2008 मध्ये तिने 'महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन' हा सौंदर्यवती स्पर्धेचा किताब जिंकला होता. तिचा पहिला चित्रपट 'क्षणभर विश्रांती' हा मराठी प्रेक्षकांमध्ये इतका लोकप्रिय ठरला की त्याने 'कल्ट स्टेटस' (लोकप्रियता) प्राप्त केली. लपाछपी चित्रपटातील तिच्या सर्वोत्तम अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले होते. ती डान्सवर आधारित रिॲलिटी शो बूगी वूगी आणि एक पेक्षा एक जोडीचा ममला यांमध्ये स्पर्धक होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
5 सुपरस्टार ज्यांनी करिना आणि करिश्मासोबत दिले किसिंग सीन, जवळपास सर्वच सिनेमे ठरले होते हिट