Actress Nimrat Kaur Ahluwalia : टेलिव्हिजनमधील खास भूमिकांमुळे अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालियाने (ActressNimratKaurAhluwalia) धक्कादायक खुलासे केले आहेत. सुप्रीम कोर्टात तिच्याबाबत गैरप्रकारबाबत तिने भाष्य केलंय. त्यावेळी निम्रत केवळ 19 वर्षांची होती. ती एका केसच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात (SupremeCourt) गेली होती. त्यावेळी हा प्रकार घडला.
सुप्रीम कोर्टात घडला होता निम्रत कौर अहलूवालियासोबत गैरप्रकार
'बिग बॉस 16' फेम निम्रत कौर अहलुवालियाने (Actress Nimrat Kaur Ahluwalia) सांगितलं होतं की, तिने कायद्याचं शिक्षण घेतलं हे. निम्रतने सांगितलं की, मी सुप्रीम कोर्टात केले होते, तेव्हा कोणीतरी माझ्या पार्श्वभागाला स्पर्श केलाय, असं मला वाटलं होतं. मात्र, त्यावेळी कोर्टरुममध्ये फार गर्दी होती, त्यामुळे मला वाटलं की, कोणाकडून तरी चुकून स्पर्श झाला असेल. त्यानंतर अभिनेत्री निम्रत कौर अहलूवालीया तिची जागा बदलली आणि कोर्ट रुममध्ये दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन उभारली. निमृत कौर अहलुवालिया यांनी हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तिने पाहिले की तो माणूस तिच्या मागे येत आहे तेव्हा तिला आणखी धक्का बसला.
तेव्हा महिलांनी त्याच्या कानशिलात लगावली आणि खडे बोलही सुनावले होते
"मला थोडी अस्वस्थता वाटू लागली आणि मी विचार केला की आपण जागा बदलूया. मग मला कोणीतरी माझ्या हाताला स्पर्श केल्याचे जाणवले आणि तो तोच माणूस होता. तो मागून माझ्याकडे आला, नंतर त्याने माझ्या नितंबाला स्पर्श केला होता. माझ्या डोळ्यात अश्रू आले, मला धक्का बसला होता. मात्र जेव्हा त्याने याची कबुली दिली तेव्हा महिलांनी त्याच्या कानशिलात लगावली आणि खडे बोलही सुनावले होते. पोलीस अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आलं", असंही तिने सांगितलं.
अभिनेत्री निम्रत कौर अहलूवालीया हिला 'छोटी सरदारनी'मधून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने 'बिग बॉस 16' आणि 'खतरों के खिलाडी 14' मध्ये सहभाग नोंदवला होता. सध्या ती पंजाबी चित्रपट 'शौकीन सरदार'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तो बाबू मान आणि गुरु रंधावासोबत आहे. हा चित्रपट 16 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
