Mouni Roy Angry Reaction On Divorce Rumours: टेलिव्हिजवरुन (Television News) पदार्पण करणारी आणि त्यानंतर बॉलिवूडचा (Bollywood News) रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या मोठं वादळ आल्याचं बोललं जातंय. 'नागीन' (Naagin TV Serial) फेम अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातंय. चार वर्षांच्या सुखी संसारानंतर आता हे जोडपं वेगळं होण्याची शक्यता आहे, असंही सांगितलं जातंय. त्यामुळे सध्या मौनी रॉय (Actress Mouni Roy) आणि तिचा पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) दोघेही चर्चेत आहेत. दोघांच्या नात्याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं. पण, नेमकं सत्य काय? याबाबत आता मौनी रॉय हिनं पोस्ट करुन सगळं खरं सांगून टाकलं आहे.
आपल्या चार वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या बातम्यांमुळे, मौनी रॉय आणि सूरज नांबियार हे जोडपं सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय बनलंय. दुबईस्थित व्यावसायिक असलेल्या सूरज नांबियार यानं आपली पत्नी मौनी रॉय हिची फसवणूक केल्याच्या अफवा गेल्या काही काळापासून पसरत होत्या. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या सततच्या चर्चा आणि तर्कवितर्कांमुळे अखेर स्वतः मौनी रॉय हिनं आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, अखेर मौनीचा संयम सुटला (Mouni Roy On Divorce Rumours)
सूरज नांबियारपासून विभक्त होत असल्याच्या सुरू असलेल्या अफवांवर प्रतिक्रिया देताना, 'नागीन' फेम अभिनेत्रीनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपला संताप व्यक्त करताना तिनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, "मी सर्व माध्यमांना अशी विनंती करते की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या खोट्या बातम्या किंवा चुकीची माहिती पसरवू नये आणि आमच्या प्रायव्हसीचा आदर राखून आम्हाला थोडी मोकळीक द्यावी..." या मेसेजसोबतच, मौनी रॉय हिनं हात जोडल्याचा इमोजी देखील पोस्ट केलाय.
मौनीच्या नवऱ्यानं दिला धोका?
मौनी रॉयची ही प्रतिक्रिया तिच्या पतीवर, सूरज नांबियारवर, लावण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आली आहे. विशेषतः, 'एबीपी न्यूज'च्या 'सास बहू साजिश' या कार्यक्रमात मौनी रॉयच्या घटस्फोटाबाबत एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सुत्रांच्या हवाल्यानं 'एबीपी न्यूज'नं असा दावा केलाय की, "मौनी रॉयचा दुबईस्थित व्यावसायिक पती सूरज नांबियार यानं तिची फसवणूक केली असून, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच तिचा वापर केला आहे. पुढे असाही दावा करण्यात आलाय की, सूरजनं मौनीच्या पैशांचा वापर स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी केलेला. याशिवाय, त्याच अहवालात असंही ठामपणे नमूद करण्यात आलं होतं की, मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार हे आधीच वेगळे झाले असून त्यांनी घटस्फोटही घेतला आहे.
मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाच्या चर्चा का सुरू झाल्या?
काही नेटकऱ्यांच्या लक्षात आलं की, मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना 'अनफॉलो' केलं आहे. जेव्हा मौनीची जवळची मैत्रीण दिशा पटानी हिनंही सूरजला 'अनफॉलो' केलं, तेव्हा नेटकऱ्यांचा हा संशय खात्रीत बदलला. त्याच वेळी, सूरज नांबियार यानंही त्याच्या इन्स्टा हँडलवरुन लग्नाचे आणि मौनीसोबतचे सर्व फोटोही डिलिट केले. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान, तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी जानेवारी 2022 मध्ये गोव्यामध्ये विवाह केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
