Marathi Serial Actress Accident: मालिकेचं किंवा चित्रपटाचं शूटिंग करताना अनेकदा कलाकारांना ॲक्शन सीन शूट करताना तर कधी अनावधानाने काही अपघात होताना दिसतात. कधी कधी कलाकारांना त्यामुळे दुखापतही झालेली असते. नुकतच महेश कोठारे यांच्या मालिकेतील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर घडलेल्या अपघाताचा प्रसंग सांगितला आहे. मालिकेच्या शूटिंग दरम्यान चालू सीनमध्ये जवळपास दोन मजले होतील, एवढ्या उंचीचा एक खांब अभिनेत्रीच्या अंगावर पडल्याचं तिने सांगितलं. 'इट्स मज्जा 'ला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. आउटडोर शूट करत असताना हा अपघात झाला. 'उदे गं अंबे उदे ' मालिकेतील अभिनेत्री मयुरी कापडणेनं हा अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला आहे. मयुरीने याआधी 'माझा होशील ना ', 'घाडगे अँड सून' या मालिकांमध्ये ही काम केलं आहे.
नेमका कसा झाला अपघात ? अभिनेत्री म्हणाली ..
अभिनेत्री मयुरी कापडणेने 'उदे ग अंबे उदे ' मालिकेतील शूटिंग दरम्यान झालेल्या अपघाता विषयी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली. ती म्हणाली 'आजवर निजा मालिकांमध्ये काम केलं आहे त्यापैकी 'उदे ग अंबे उदे' ही मालिका सगळ्यात उत्तम होती. उत्तम सेट आणि उत्तम कलाकार या मालिकेत होते.मी कधीच विचार केला नव्हता की सेटवर माझ्यासोबत असा काही अपघात घडेल.आम्ही एक आउटडोअर शूट करत होतो. त्यावेळी तिथे सिरॅमिक आणि रोड असलेला एक खांब होता.जवळपास दोन मजले होतील एवढ्या उंचीचा तो खांब चालू सीनमध्ये माझ्या अंगावर पडला. मी थोडक्यात वाचले.कारण तो काम कमरेपासून खाली पडला. जर तो खांब डोक्यावर पडला असता तर काहीतरी मोठी दुखापत झाली असती. ' असं मयुरीने सांगितलं.
जागेवरून उठता येईना, अर्धा तास चेहरा मातीत ..
ती पुढे म्हणाली 'मला आठवतच नव्हतं तेव्हा काय घडलं.मी जागेवर पडले होते.जवळपास अर्धा तास माझा चेहरा मातीत होता. मी फक्त आई म्हणून जोरात ओरडले. त्यानंतरच मला काहीही आठवत नाही. माझी अवस्था तेव्हा खूप खराब होती. सगळीकडे मला अंधार दिसत होता, जागेवरून उठतही येत नव्हतं. तिथे कुणीतरी माझ्या कानातलं काढत होतं कोणी माझ्या गळ्यातलं काढतंय.काहींचा रडण्याचा आवाज येत होता.पण त्यावेळी युनिट मधील आणि प्रोडक्शनमधील सगळ्यांनी माझी खूप काळजी घेतली.'
ज्या दिवशी हे घडलं तेव्हा तातडीने मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.सिटीस्कॅन वगैरे चेकअप करण्यात आले.मग महेश सर स्वतः धावत मला भेटण्यासाठी सेटवर आले होते.माझ्याशी बोलले माझी विचारपूस केली.त्यानंतर मग शेड्युलवर आले आणि म्हणाले उद्याचं काय होईल.एपिसोड अडकलाय.जर एखादी व्यक्ती आपल्याशी प्रेमाने बोलतीये काळजी दाखवते, त्यावेळी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.माझ्याकडून ते होण्यासारखं होतं म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी सेटवर गेले.सेटवर गेल्यानंतर प्रत्येकाने माझी खूप काळजी घेतली. 'असं अभिनेत्री मयुरी कापडणे म्हणाली.
