Actress Manasi Parekh Gave Advice On Cosmetic Surgery: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि सौंदर्य अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेल्या कॉस्मॅटिक सर्जरी (Cosmetic Surgery) याबाबत नेहमीच चर्चा रंगतात. यापासून कोणा अभिनेत्रीची सुटका झालेली नाही. काही दिवसांपूर्वी 'काँटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) निधनानंतर कॉस्मॅटिक सर्जरी आणि बोटॉक्स ट्रिटमेंटच्या जोरदार चर्चा रंगलेल्या. शेफालीच्या अचानक जाण्याला याच ब्युटी ट्रिटमेंट कारणीभूत असल्याचं सांगितलं जात होतं. अशातच आता गुजराती आणि हिंदीत आपलं नाव रुजवणाऱ्या अभिनेत्रींनं सुंदर दिसण्यासाठी केली जाणारी कॉस्मेटिक सर्जरी, अनरिअॅलिस्टिक ब्युटी स्टँडर्ड्स यावर भाष्य केलं आहे. 

'गुलाल' या सुप्रसिद्ध मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मानसी पारेख हिनं एका चॅट शोमध्ये बोलताना कॉस्मेटिक सर्जरी आणि ब्युटी ट्रिटमेंट्सवर भाष्य केलं आहे. फ्री प्रेस जर्नलच्या चॅट शोमध्ये मानसी पारेख सहभागी झाली होती. यावेळी बोलताना अभिनेत्रीनं सांगितलं की, "महिलांच्या सौंदर्यावर कायमच टिप्पणी केली जाते. त्यांचं सौंदर्याचं मोजमाप ठरवलं जातं. विशिष्ट वय झालं की, तुम्हाला तुमच्या सुंदरतेवर लक्ष दिलं पाहिजे, असं सर्रास म्हटलं जातं. जर तुम्ही कॅमेऱ्यासमोर काम करत असाल तर मग हा दबाव आणखी जास्त असतो. तुम्हाला तुमच्याच शरिरामध्ये काही ना काही कमीपणा दिसायला लागतो. मग तुम्ही सर्जरी करुन ते ठीक करायचा प्रयत्न करता. आजकाल तर खूप आधुनिक गोष्टी आल्या आहेत. मला वाटतं कॉम्सेटिक सर्जरी करण्यात काहीच चुकीचं नाही. ही ज्याची त्याची निवड आहे."      

"पण जर तुम्ही लोक म्हणतायेत किंवा समाज नावं ठेवतोय म्हणून तुमच्या शरिराच्या एखाद्या भागाची सर्जरी करत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला कोणाच्याही व्हॅलिडेशनची गरज नसली पाहिजे. जर तुम्हाला स्वत:हून वाटत असेल तर बिंधास्त करा. पण कोणा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन करु नका.", असं मानसी पारेख म्हणाली. 

दरम्यान, अभिनेत्री मानसी पारेखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 'गुलाल', 'सुमित संभाल लेगा' यांसारख्या मालिकांमध्ये दिसली होती. मानसी अभिनेत्रीसोबतच गायिका आणि निर्माती आहे. तसेच, तिला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यातंही आलं आहे. 'कच्छ एक्सप्रेस' या सिनेमासाठी मानसीला गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'मला बेबोसोबत इंटिमेट होताना मज्जा आली...', बॉलिवूड अभिनेत्याचं करिना कपूरबाबत खळबळजनक वक्तव्य, नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं