Kunickaa Sadanand Mothers Death: बॉलिवूडची प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री (Bollywood Actress) आणि बिग बॉस कंटेस्टेंट (Bigg Boss) कुनिका सदानंद (Kunika Sadanand) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुनिका सदानंद यांची आई कल्याणी सदानंद  यांचं निधन झालं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचं गोव्यात निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी (6 ऑक्टोबर) रोजी कुनिका सदानंद यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Social media) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आईचा फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमधून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून मार्गदर्शन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या आईचे आभार मानले आहेत. कुनिका सदानंद यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, सिने कलाकार तसेच नेटकऱ्यांनी त्यांच्या आईवर श्रद्धांजली वाहिली आहे. 

Continues below advertisement

कुनिका सदानंद यांच्या आईचं निधन (Actress Kunickaa Sadanand mothers Death in Goa)

कुनिका सदानंद यांनी आपल्या आईसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'आई. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला तू जे काही दिलंस, त्यासाठी खूप आभार.   प्रेम, मार्गदर्शन, स्वप्न बघण्यासाठी स्वातंत्र्य, आत्मविश्वास, सुंदर लूक, पर्सनॅलिटी आणि आव्हानाला सामोरे जाण्यासाठी बळ दिलेस, त्याबद्दल आभार. आई, तू जोडलेल्या माणसांच्या मनात कायम राहशील.  एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून तू कायम लोकांच्या लक्षात राहशील. मला खात्री आहे, की आता आपल्या भावंडांना भेटून तुला नक्कीच आनंद झाला असेल. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.  तू पत्नी, आई, बहीण, आजी आणि तु्झ्या आयुष्यातील इतर सर्व नाती अगदी प्रेमाने आणि काळजीने पार पाडली आहेस', असं पोस्टमध्ये कुनिका सदानंद म्हणाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, कुनिका सदानंद यांच्या आईचं निधन गोव्यात झालं. त्यांचं गोव्यातच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, इतर विधी मुंबई पूर्ण केले जातील, अशी माहिती आहे. आईच्या निधनानंतर अभिनेत्री खचली असून, कुनिका सदानंद यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल आहे. सध्या कुनिका सदानंद यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, या पोस्टमध्ये सिनेकलाकार तसेच चाहत्यांनी कमेंट करुन त्यांच्या आईवर श्रद्धांजली वाहिली आहे. कुनिका सदानंद यांच्या प्रोफेशनलबाबत बोलायचं झाल्यास, त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत टीव्ही तसेच सिनेइंडस्ट्रीत काम केलं आहे.  त्यांनी 'बिग बॉस'मध्येही सहभाग घेतला होता.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'नहीं बताऊंगी...'; जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईक ढकलला, कंगना रनौतने VIDEO शेअर करत लगावला टोला