Kajol VIDEO: अभिनेत्री काजोलने (Kajol) 2025 च्या मुंबईतील नवरात्री उत्सवात दुर्गा पूजा कार्यक्रमांमध्ये भाग घेतला असून, तिचे कुटुंबिय आणि मित्रमंडळींसोबतचे क्षणही चर्चेत आहेत. काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यासह जया बच्चन आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी दुर्गा पूजा उत्सवात भाग घेतला होता. विजयादशमीनिमित्त काजोल दुर्गा पूजाच्या (Kajol In Durga Puja) विधींमध्येही सहभागी झाली होती. याचदरम्यान, काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

नेमकं काय घडलं, व्हिडीओमध्ये काय? (Kajal Viral Video)

अभिनेत्री काजोल गर्दीतून पायऱ्या उतरत आहे. यादरम्यान, एका व्यक्ती काजोलचा हात धरतो अन् तिला वर खेचतो. अचानक हात धरुन मागे खेचल्याने काजोलही आर्श्चयचकीत होते. नेमकं काय घडतंय तिला समजत नसल्याचं व्हिडीओमधून दिसून येतंय. मात्र यासर्व प्रकरणानंतर काजोल सदर व्यक्तीसोबत सेल्फी घेते. दरम्यान, सदर व्यक्ती काजोलचा बॉडीगार्ड असल्याचं बोललं जात आहे. मात्र या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

काजोलचे आगामी प्रोजेक्ट्स- (Kajol Upcoming Films)

काजोल सध्या तिच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या टॉक शोमध्ये व्यस्त आहे. काजोल आगामी काळात "द ट्रायल: प्यार कानून धोखा" सीझन 2 आणि प्रभु देवाच्या आगामी चित्रपट "महाराग्नी: क्वीन ऑफ क्वीन्स" मध्ये दिसणार आहे.

कोण आहे काजोल? (Who Is Kajol)

काजोल ही एक प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिने मराठी भाषेतील 'विट्टी दांडू' या चित्रपटाच्या निर्मितीमध्येही काम केले आहे आणि तिथे तिला 'स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' मिळाला आहे, ज्यामुळे ती एका अर्थाने 'मराठी' अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.  काजोलने 1992 मध्ये 'बेखुदी' या चित्रपटातून पदार्पण केले आणि 1993 मध्ये 'बाजीगर' या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटात काम केले. काजोलला 6 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात 5 'सर्वोत्तम अभिनेत्री' श्रेणीतील पुरस्कारांचा समावेश आहे. तिला 2011 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. 

ही बातमीही वाचा:

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या-अभिषेकचा YouTube विरोधात 4 कोटींचा दावा, परवानगीशिवाय कपलचा AI व्हिडीओ वापरल्याची तक्रार