Indira Krishnan Shares An Incident: बॉलिवूडचं (Bollywood News) जग जेवढं झगमगतं दिसतं, तेवढीच त्याची दुसरी बाजू काळ्याकुट्ट अंधारानं व्यापलेली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंत याबाबत अनेक सेलिब्रिटींनी आपापली बाजू व्यक्त केली आहे. अशातच अलिकडेच चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेत्री इंदिरा कृष्णन (Television Actress Indira Krishnan) यांनी इंडस्ट्रीबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. यासोबतच, त्यांनी इंडस्ट्रीतील लोकांकडून कामाच्या मोबदल्यात दिल्या जाणाऱ्या कास्टिंग काऊचच्या ऑफरबद्दलही उघडपणे सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिला हिंदी इंडस्ट्रीपेक्षा दक्षिण इंडस्ट्रीमध्ये (South Industry) असे अनुभव जास्त वेळा घ्यावे लागले.
बॉलिवूड बबलशी बोलताना इंदिरा कृष्णन (Indira Krishnan) म्हणाल्या की, त्यांना एकापेक्षा जास्त वेळा कास्टिंग काऊचच्या (Casting Couch) घटनांना सामोरं जावं लागलं. याबाबत खुलासा करताना अभिनेत्री म्हणाली की, "मला हे फक्त एकदाच नाहीतर, अनेकदा जाणवलं आहे. विशेषतः मी असं म्हणणार नाही की, हे हिंदी चित्रपट इंडस्ट्री किंवा मुंबईत जास्त वेळा घडलंय, तर साऊथमध्येही मला असे धक्कादायक अनुभव आले आहेत. मला एका बड्या चित्रपट निर्मात्यानं एका खूप मोठ्या प्रोजेक्टसाठी निवडलेलं. त्या प्रोजेक्टबाबत आमचे काही मतभेद होते. मी त्या प्रोजेक्टसाठी पूर्णपणे तयार होते, पण शेवटच्या क्षणी, जसं अनेक वेळा घडतं, एका छोट्याशा गोष्टीनं संपूर्ण नातं खराब केलं. फक्त एक ओळ, एक वाक्य आणि ते सर्व काही संपलं..."
नेमकं काय घडलेलं? अभिनेत्रीनं सांगितला किस्सा...
इंदिरा कृष्णन पुढे बोलताना म्हणाल्या की, "मला आठवतंय की, मला आधी वाटलेलं की, हा चित्रपट माझ्या हातून निसटला आहे. मग घरी पोहोचल्यानंतर मी त्याला मेसेज टाईप केला, कारण तो ज्या पद्धतीनं बोलत होता, त्याची देहबोली आणि त्याच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. यासोबतच दबावही वाढू लागला. मला वाटलं की, मी ही परिस्थिती हाताळू शकणार नाही. मी विचार केला की, जर उद्यापासून शूटिंग सुरू झालं आणि हे सारंच बिघडलं तर काय होईल? मी खूप आदरानं म्हणाले की, मी माझी प्रतिभा विकायला आलेय, स्वतःला नाही. कदाचित माझे शब्द थोडे कठोर असतील, पण मला वाटलं की, तुम्ही जितके स्पष्ट असाल तितकं चांगले होईल. यामुळे तुम्हाला तुमचा वेग टिकवून ठेवण्यास, ऊर्जा वाढवण्यास आणि पुढे जाण्यास मदत होते.
छोट्या पडद्यानं मला अधिक चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करण्याची संधी दिली
इंदिरा कृष्णन पुढे म्हणाल्या की, कास्टिंग काउचची ही पहिली किंवा शेवटची घटना नव्हती. यामुळे मी काही चांगले प्रोजेक्ट गमावले. करिअरसाठी ती टेलिव्हिजनकडे वळली, तेव्हा हा टर्निंग पॉईंट होता. छोट्या पडद्यानं मला माझ्या क्षमता चांगल्या प्रकारे दाखवण्यास मदत केली. तसेच, मला तिथे पुरेसा आदर मिळाला. हो, मी ऐकलं आहे की, टीव्ही इंडस्ट्रीमध्येही अशा अनेक गोष्टी घडतात. पण मला वाटतं त्यावेळी, आपल्या सर्वांनाच याचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, अभिनेत्री इंदिरा कृष्णन लवकरच आगामी 'रामायण' सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमात अभिनेत्री कौशल्याची भूमिका साकारणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :