Divya Khosla on Govinda And Sunita: गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) सध्या दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुनीता आहुजाने आतापर्यंत गोविंदावर बरेच गंभीर आरोप केले आहेत. कोमल राणी स्वर्णकार (Komal Rani Swarnkar) ही गोविंदाची को - स्टार आणि रुमर्ड गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. गोविंदाचा 'रुपा' (Roopa) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात को - स्टार म्हणून कोमल राणी स्वर्णकार झळकणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि को - स्टार दोघेही एकत्र मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजाच्या' दर्शनासाठी गेले होते. त्यांचे फोटोस सोशल मीडियात (Social media) तुफान व्हायरल झाले. गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकारवर सध्या टीकांचा पाऊस पडत आहे. अशातच अभिनेत्री दिव्या खोसला (Divya Khosla) हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'गोविंदाच्या या कृतीचा फ्यूचर जनरेशनवर चुकीचा नकारात्मक प्रभाव पडेल', असं तिने म्हटलं आहे.
गोविंदाबाबत दिव्या खोसला नेमकं काय म्हणाली? (Divya Khosla Supports Sunita Ahuja Questions Govinda)
दिव्या खोसला हिने या प्रकरणाशी संबंधित एक लांबलचक पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे. दिव्या खोसला हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'बऱ्याच गोष्टी घडत असल्याचं पाहत आहे, त्यामुळे मी आता स्वत:पुरते ठेवू शकत नाही. आपल्या सोसायटीमध्ये पहिले महिला पुरुषांसाठी मजदूर म्हणून काम करायचे. अनेक वर्षे आपल्या पणजींनी मुलींना इन्डिपेन्डेट, अभ्यास आणि स्वत:च्या पायावर उभं राहायला मिळावं, यासाठी खूप मेहनत घेतली. जेणेकरुन स्त्रिया पुरुषांसाठी मजूर म्हणून राहणार नाही'.
'पण अलिकडे जे काही सोशल मीडियात घडत आहे, त्यामुळे माझ्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहे', असं दिव्या खोसला म्हणाले. 'गोविंदा खूप सिनिअर आणि आदरणीय कलाकार आहेत. त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो आहोत. गोविंदा यांचे चित्रपट खूप मनोरंजक असायचे. एवढंच नाही, गोविंदा जी, तुम्ही माझ्या आईचे फेवरेट अॅक्टर होते. तुमचा चाहतावर्ग खूप मोठा आहे', असं दिव्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाली. 'तुमची पत्नी सुनीता आहुजा यांचाही तुमच्या सक्सेसमध्ये मोठा वाटा आहे. तुमच्या मुलांचा त्यांनी सांभाळ केला. तुम्ही यशस्वी झालात, यामागे केवळ तुमचा मोलाचा वाटा नाही. त्यांनाही क्रेडिट मिळायला हवं',असं दिव्या म्हणाली. 'मला असं वाटतं की तुम्ही कधी तुमच्या मुलांची जबाबदारी घेतली नाही', असंही आपल्या पोस्टमध्ये दिव्या खोसला म्हणाली.
'खरंतर कुणालाही कुणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नसते. पण गोविंदा जी दर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या तरुणीसोबत का स्पॉट होतात? मला हे बघून खूप वाईट वाटतं. आपण पुढच्या पिढीला कोणती प्रेरणा देत आहोत?', असा सवाल दिव्या खोसलाने उपस्थित केला. 'जर तुमचं अफेअर असेल तर, जाहीरपणे शो - ऑफ करु नका. आम्हाला त्यात रस नाही. मला सुनीताजींना सांगायचं आहे की, ज्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत, त्यामुळे मला वाईट वाटलं. गोविंदाजींसमोर माझी विनंती आहे की, तुम्ही लेजंड आहात. पण सर, तुमचा सन्मान तुमच्या हातात आहे. तुम्ही फ्युचर जनरेशनसाठी एक वाईट उदाहरण घालून देत आहात. तुम्ही माझ्या नजरेत तुमचा आदर गमावला आहात', असं दिव्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
