Actress dame maggie smith passed away : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं लंडनमध्ये निधन (dame maggie smith passed away) झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 'हॅरी पॉटर' आणि 'डाउंटन ॲबे' या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. डेम मॅगी स्मिथ यांना हॅरी पॉटर सिरीजमधील प्रोफेसर मॅकगोनागलच्या भूमिकेतून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या निधानाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. 


डेम मॅगी स्मिथ यांची मुले टोबी स्टीफन्स आणि ख्रिस लार्किन यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. अत्यंत दुःखाने कळवत आहोत की मॅगी स्मिथचे निधन झाले आहे. 27 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ती काही काळ आजारी होती. त्यांच्या अखेरच्या क्षणी कुटुंबीय त्यांच्यासोबत उपस्थित होते अशी माहिती मुलांनी दिली आहे. 


मॅगी स्मिथ यांना मिळाले होते दोन ऑस्कर 


हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत मॅगी यांच्या नावाचा समावेश होता. ब्रिटिश वंशाच्या मॅगी यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोन ऑस्कर पुरस्कार जिंकले. त्यांनी 1970 मध्ये 'द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर आणि 1978 मध्ये 'कॅलिफोर्निया सूट'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला होता. दरम्यान, त्यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


हॅरी पॉटरमधील भूमिका प्रेषकांच्या मनात आजही कायम


मॅगी यांचा जन्म 1934 साली झाला होता. त्या अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री होत्या. त्यांच्या करिअरच्या आलेखात कामात विविधता पाहायला मिळाली. त्या विनोदी भूमिकेसाठी नावाजल्या गेल्य. शिवाय या प्रतिभावान अभिनेत्रीने नॉन-कॉमेडी भूमिकांही उत्कृष्ट पद्धतीने निभावल्या आणि त्याकरता पुरस्कार पटकावले. 'हॅरी पॉटर'मध्ये त्यांनी निभावलेली 'प्रोफेसर मॅक्गोनागल' ही भूमिका आजही अनेक चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. 1934 साली ऑक्सफोर्डमध्ये जन्मलेल्या स्मिथ यांनी सुरुवातीला प्लेहाऊस थिएटरमध्ये काम केलं आहे. तर पुढे 1958 साली 'नोवेयर टू गो' या सिनेमात पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. स्मिथ यांनी मनोरंजनासहित सिनेमातून नवा विचार देखील दिला. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे मित्र आणि कुटुंब हजर होतं. दोन मुले आणि एकूण पाच नात-नातूंना सोडून गेल्या आहेत. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


महत्वाच्या बातम्या:


Tyler Christopher Passed Away : हॉलिवूड हादरलं! अभिनेते टायलर ख्रिस्तोफर यांचे निधन; वयाच्या 50 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास