Kangana Ranaut Hits Back at Trolls: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सीजेपी आंदोलनावर (CJP Protest) करत असलेल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अलिकडेच, कंगनाने सीजेपीच्या आंदोलनावर आक्षेप घेणारी एक पोस्ट शेअर केली होती. तिनं जेन झींच्या तरुणींना, 'जनरेशन गटार' असं म्हटलं होतं. यामुळे मोठा गदारोळ (Social Media) निर्माण झाला होता. यानंतर सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी तिच्या सिनेमातील भूमिकांचे क्लिप्स शेअर करुन तिला टार्गेट करण्यास सुरुवात केली. आता कंगनाने या टीकेला उत्तर देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये, तिने पडद्यावरील आणि वास्तविक जीवनातील फरक स्पष्ट केला आहे. तिनं म्हटलं की, लोक तिच्या पडद्यावरील साकारलेल्या पात्रांची आणि वास्तविक जीवनातील विचारांशी किंवा वक्तव्यांची चुकीची तुलना करत असल्याचं सांगितलं. तिने यावेळी लोकांना तरुण पिढीची दिशाभूल न करण्याचे आवाहनही केले आहे.
चित्रपटातील पात्रांची उदाहरणे देणे चुकीचं - कंगना रनौत (Kangana Ranaut Hits Back at Trolls Over Viral Movie Clips)
कंगना रनौतने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच तिने संसदेत दिलेल्या तिच्या एका जुन्या भाषणाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला. या भाषणादरम्यान, कंगनाने राजकीय विरोधकांकडून तिच्या सिनेमातील फोटो मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यावर तीव्र आक्षेप घेतला. 'एक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारणं हा माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे. ज्या पात्रांसाठी मला लाखो रुपये मिळतात, त्या पात्रांच्या क्लिप्सचा वापर करून तुम्ही तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात'.
'मोठ्या कार्यक्रमांमध्ये, बिझनेस इव्हेंट्समध्ये मी माझ्या टीमसोबत सहभागी होत असते. या गोष्टींचा वापर करून तुम्ही तरुण वर्गाला रस्त्यावर, शाळेतील कार्यक्रमांमध्ये किंवा छोट्या क्लबमध्येही तसेच वागता येईल, असा संदेश देणं हे काही योग्य नाही. ही काय एकच गोष्ट आहे का? तरुणांची दिशाभूल करणं थांबवा. कारण यात काहीच साम्य नाही. आज तुम्ही दुसऱ्या मुलांची दिशाभूल करत आहात, उद्या तुमच्याही मुलांची दिशाभूल होऊ शकते', असंही कंगना आपल्या पोस्टमध्ये म्हटली. सध्या कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
